
कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय बोंद्रे घराण्याला महापौर पद पहील्यांदाच मिळाले असून महापौर शोभा बोंद्रे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला.
शिक्षण १० वी पास आहे. ते कसबा तारळे येथे झाले. त्यांचे मुळ गाव कसबा तारळे आहे.
पावसाळा तोंडावर आला आहे या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, डेंग्यू सारखे आजार निवारण व होऊ नये म्हणून उपाययोजना तसेच थेट पाईप लाईन साठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन महापौर सौ. शोभा बोन्द्रे यांनी सांगितले.
महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणार तसेच प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न करू आणि महापौर व उपमहापौर ही पदे फक्त शोभेची नाहीत हे दाखवून देऊ अशी उपमहापौर महेश सावंत यांनी प्रतिक्रिया दिली.
Leave a Reply