
कोल्हापूर: सुप्रसिद्ध बॉलीवूड पॉप गायिका ‘शर्ली सेटीया’चा कोल्हापुरात प्रथमच लाईव्ह शो पार पडला. ती आली तिने पाहिले आणि जिंकले असा माहोल हॉटेल सयाजी च्या साज लॉन वर पाहायला मिळाला. शर्ली ने स्टेज वर एन्ट्री करताच कोल्हापूर करांनी तिचे जल्लोषात स्वागत केले. मी कोल्हापूर मध्ये प्रथमच येत आहे. इथले वैशिष्ट्य असणारे कोल्हापुरी चप्पल मी घेतले आहे. अशी दाद शर्लीने कोल्हापूरकरांना दिली. तुम हो तो,क्या खो ना,बोल ना तू जरा, हम्मा हम्मा, कच्ची डोरियो से,खमोशिया, ‘तेरी दिवानी, जब कोई बात बिघड जाये,मेरे रशके कवल, में तेरा बॉयफ्रेंड, सारखी एका पेक्षा एक सरस बॉलीवूड गाणी गाऊन शर्लीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच लग जा गले, बदन पे सितारे,ये चांद सा रोशन चेहरा, हे अपना दिल तो आवारा सारख्या जुन्या गाण्यांना नवीन साजात गायली.याबरोबरच सुफी, पंजाबी, डिस्को,पॉप,अश्या विविध प्रकारची गाणी गाऊन रसिकांच्या मनावर शर्लीने अधिराज्य गाजवले.अगदी कमी कालावधीतच लोकप्रियतेचे शिखर गाठलेली यु ट्यूब ची सेंसेशन, आघाडीची बॉलीवूड पॉप सिंगर व इंडो किवी सिंगर (गायिका) ‘शर्ली सेटीया’ जिच्या गाण्यांना १४ लाखाहून अधिक यु ट्यूब सबस्क्रायबर, ३३ लाख फेसबुक व एक लाखाहून अधिक ट्विटर फॉलोअर्स आहेत.व अजूनही याची संख्या वाढतच आहे. अश्या हिट व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सिंगरचा लाईव्ह शो एम्बीएन्स इव्हेंट व चंद्र साडीचे आशिष नागदेव, टोमॅटो एफ एम व चांदवाणी ग्रुपचे श्याम चांदवाणी यांच्या संयोजनाने कोल्हापुरात प्रथमच झाला.याला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला.तरुणाईला तिच्या मधुर आवाजाने भुरळ पाडली. सर्वात कमी वयाची व सुंदर गायिका म्हणून तीची जगभर ख्याती आहे.भारतातील तिचा हा आठवा शो होता.
Leave a Reply