
शिवराज्याभिषेक सोहळा दिनानिमित्त आज दुर्गराज रायगडावर खासदार संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या सुविद्य पत्नी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड प्राधिकरणच्या वतीने गडावरील अति अवघड तसेच खोल दरीतील कचरा गिर्यारोहकांच्या मदतीने काढण्यात आला असून ही मोहिम उद्या पर्यंत चालू राहणार आहे.
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण तसेच शिवमय वातावरणात संपन्न होत असतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवराज्याभिषेक महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जाणार आहे तरी खासदार संभाजीराजे छत्रपती व त्यांच्या सुविद्य पत्नी युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी रायगड प्राधिकरणच्या माध्यमातून किल्ले रायगडवरील खोल दरी खो-यातील व सहजासहजी न काढता येणारा कचरा काढून पर्यावरणपूरक प्लॅस्टिक मुक्त रायगड असा संकल्प राबविण्यात येणार आहे. त्यानुसार आज सकाळी तज्ञ गिर्यारोहकांच्या मदतीने किल्ले रायगडाच्या दरीतील प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात काढण्यात आला असून ही मोहिम दि. २७ मे पर्यंत चालू राहणार आहे. या मोहिमेमध्ये महाराष्ट्रातील गिर्यारोहकांनी सहभाग घेतला असून सुमित अॅडव्हेंचर्स, मलाय अॅडव्हेंचर्स, 32 MS मुंबई, हिल रायडर्स कोल्हापूर, शंभूराजे मर्दानी खेळ विकासमंच कोल्हापूर, कोल्हापूर माउंटेनिअरींग अॅंड अॅडव्हेंचर फाऊंडेशन आदी संस्थांनी सहभाग घेतला. या मोहिमेसाठी शिवाजी विद्यापीठ यांचे मार्फत गिर्यारोहकांना लागणा-या साहित्य, साधनांचा पुरवठा करण्यात आला.
Leave a Reply