
कोल्हापूर : कर्नाटक राज्यात १०४ भाजपचे आमदार असताना ३८ आमदार निवडून आलेल्या जेडीएस पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळाले म्हणजे ७८ आमदार असलेल्या काँग्रेस ने घोडेबाजार केला अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केली. केंद्र सरकारला यंदा चार वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांच्या सरकारने केलेल्या कामाचा लेखाजोखा आज चंद्रकांत दादांनी पत्रकारांसमोर मांडला. पेट्रोलच्या दराबाबत विचारले असता प्रत्येक राज्याच्या व्हॅटमध्ये कपात करून पेट्रोल नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तसेच महाराष्ट्र राज्यात पेट्रोल जीएसटी मध्ये आणण्याचे प्रयत्न सुरू आहे असेही चंद्रकांतदादा यांनी सांगितले.चार वर्षाचा लेखाजोखा मांडताना चंद्रकांत पाटील म्हणाले ‘ उज्वला योजनेअंतर्गत पाच कोटी गॅस कनेक्शन देण्याचे उद्दिष्ट केंद्राने समोर ठेवले असून त्यापैकी तीन कोटी गॅस वितरित झाले आहेत. ८३ टक्के शौचालय यांचे काम पूर्ण झाले असून ७ कोटी २५ लाख नवीन शौचालय बांधण्यात आले आहेत. तीन लाख साठ हजार गावे देशातील हागणदारीमुक्त झाली आहेत. पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. यावर्षी दोनदा एफ आर पी मध्ये वाढ करून एफ आर पी देणे हे बंधनकारक केले आहे. ३४ हजार कोटींची शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. ३१.५२ कोटी जनधन खाती, १३ कोटी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत दरवर्षी १२ रुपयात विमा, पाच कोटी कुटुंबांना ३३० रुपयात विमा, असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी अटल पेन्शन योजना याचे एक कोटीपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. प्रधानमंत्री वय वंदन योजना आणली.यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सुरक्षितता यामध्ये पंधरा लाख पर्यंत च्या गुंतवणुकीची परवानगी दिलेली आहे. शेतमालाला रास्त भाव मिळण्यासाठी ५८५ मार्केट व इलेक्ट्रॉनिक नॅशनल एग्रीकल्चर मार्केट, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पन्नास टक्क्यापेक्षा जास्त पिकांचे नुकसान झाले तर आधी मदत मिळत होती तो निकषात ते ३३ टक्क्यांवर आला आहे. अतिवृष्टीमुळे धान्याचे नुकसान झाल्यास किमान आधारभूत किमती एवढे पैसे पुरेपूर मिळणार. मृतांच्या कुटुंबीयांना मिळणारी मदत अडीच लाख रुपयांवरून चार लाख रुपये करण्यात आली आहे. खतांच्या सबसिडीची थकीत रक्कम देण्यासाठी दहा हजार कोटी रुपयांची विशेष व्यवस्था केंद्र सरकारने केली आहे. महिलांसाठी १३ वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालिकेवर बलात्कार झाल्यास फाशीच्या शिक्षेची तरतूद व १६ वर्षांपेक्षा कमी दहा वर्षावरून ही शिक्षा वाढवून वीस वर्षे करण्यात आली आहे. तिहेरी तलाक पासून मुस्लिम महिलांना संरक्षण देण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे. तसेच मुस्लिम महिलांना देखील हज यात्रा करता येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना मध्ये महिलांना प्राधान्य दिले आहे तसेच नारी शक्तीला बळ देण्यासाठी मुद्रा आणि स्टँड अप इंडिया योजनेत नऊ कोटी महिलांना लाभ मिळालेला आहे. लोकांमध्ये क्रीडा आणि फिटनेस याची संस्कृती रुजवण्यासाठी व्यापक मोहीम, दिव्यांगांसाठी आठ लाख व्यक्तींना उपकरणे व साधने प्रदान करण्यात आले आहेत. आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली. प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी पाच लाख रुपयांचे सुमारे पन्नास कोटी लोकांना आरोग्य कवच या योजनेअंतर्गत मिळाले आहे. १०५४ जीवनावश्यक औषधे किंमत नियंत्रण व्यवस्थेखाली आणल्यामुळे ग्राहकांना याचा मोठा फायदा झाला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत एक कोटी घरांची निर्मिती झाली असून २०२२ साली भारताच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे होतील तेव्हा प्रत्येक भारतीयाला स्वतःचे घर असणे असे उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवले आहे. राष्ट्रीय महामार्गाचे जाळे विस्तारले एकूण २०१७-१८ मध्ये एक लाख वीस हजार ५४३ किलोमीटरचे रस्ते बांधणी पूर्ण झाली आहे. आर्थिक विकासाचा वेग वाढला असून महागाईचा दर कमी होत आहे.
एकूणच भाजप सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करत आहे.शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांनी देखील याचा विचार पुढील काळात करावा.नाही तर याचा फायदा काँग्रेस घेईल असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
Leave a Reply