
कोल्हापूर: इचलकरंजी अमृत योजनेच्या विरोधात वारणा बचाव कृती समिती व इरिगेशन फेडरेशनचा विरोध कायम राहील. तसेच नदी प्रदूषित होऊ नये व हे थांबवण्यासाठी येत्या दोन जून ला रॅली काढण्याचा येणार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन. डी पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. प्यायच्या पाण्याला विरोध आहे असे प्रत्यक्षदर्शी दाखवले जाते. आणि अशीच भावना इचलकरंजी करांची झालेली आहे. परंतु आम्ही कधीही प्यायच्या पाण्याला विरोध केला नसल्याचे यावेळी आमदार उल्हास दादा पाटील यांनी व्यक्त सांगितले. फक्त दानोळी या जागेतून पाणी उपसा करण्यास आमचा विरोध आहे हे त्यांनी सांगितले. सध्या मजरेवाडी येथून पाणी उपसा केले जाते याला आमचा कोणताही विरोध नाही. पण एक थेंबही पाणी इचलकरंजीकरांना देणार नाहीत हे विधान साफ खोटे आहे अशी भूमिका आज स्पष्ट करण्यात आली. ज्यावेळी अमृत योजनेचे कार्यक्रमाचे भूमिपूजन होणार होते त्यावेळी आमदार उल्हास दादा पाटील यांना आमंत्रण दिले नव्हते. त्यांना अंधारात ठेवून हा कार्यक्रम सरकार करायला निघाले होते. त्याचबरोबर एन डी पाटील यांनी देखील तिथे येऊ नये यासाठी संपूर्ण बंदोबस्त करण्यात आला होता. प्रचंड फौज पोलिसांचा फौजफाटा घेऊन भूमीपूजन करण्यात आले. तरी पण दानोळी तुन पाणी उचलू देणार नाही या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असे पाटील यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला आमदार डॉ. सुजित मिणचेकर,विक्रांत पाटील उपस्थित होते.
Leave a Reply