डॉ. बत्राज यांची जेनोहोमिओपॅथी उपचार पद्धती कोल्हापूर मध्ये उपलब्ध

 

कोल्हापूर: होमिओपॅथी क्षेत्रात जगभरात गेली चार दशके आपले अव्वल आणि अनोखे स्थान निर्माण केलेल्या डॉ. बत्राज मल्टीस्पेशालिटी होमिओपॅथी क्लिनिक तर्फे आज डॉक्टरांचे उपचार पद्धतीचे भवितव्य बदलून टाकणारी क्रांतिकारी पद्धत कोल्हापुरात सादर करण्यात आली. ही क्रांतीकारी आणि अद्वितीय अशी जनूक आधारित शास्त्रशुद्ध अचूक सुरक्षित आणि प्रत्येक व्यक्तीसाठी अनोख्या प्रकारे योजिलेली होमिओपॅथिक उपचार पद्धती भारतात प्रथमच उपलब्ध होत आहे, डॉ. बत्राज मल्टीस्पेशालिटी क्लिनिकच्या कोल्हापुरात ही उपचार पद्धती डॉ. बत्रा यांच्या शाहुपुरी आणि ताराबाई पार्क येथील मल्टीस्पेशालिटी क्लिनिक मध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे असे डॉ. जिनेश्वर कपाले, डॉ. अनुराग देशमुख पत्रकार परिषदेत सांगितले. डॉ. अनुराग देशमुख म्हणाले” ही आधुनिक काळातील सानुकूल उपचार पद्धती आहे. ही जनुकीय आधारित वैयक्तिक होमिओपॅथिक केअर पद्धत आहे. व्यक्तीच्या जनुकीय रचनेनुसार यात उपचार केला जातो यामध्ये वैज्ञानिक व लक्ष उपचारासाठी व्यक्तिमत्व व जनुकांचा समावेश असतो. ही एक अत्यंत व्यक्तिगत उपचार पद्धती आहे . कोणत्याही दोन व्यक्तींची जनुके सारखी नसतात. ही त्यांच्या बोटांचे ठसे किंवा डोळ्यांतील बुभुळा प्रमाणेच वेगवेगळी असतात. म्हणूनच अस्तित्वात असलेल्या पारंपारिक उपचार पद्धती पेक्षा डॉ. बत्राज जेनोहोमिओपॅथीमध्ये एकच वैद्यकीय आजार असलेल्या दोन रुग्णांवर औषधोपचार केला जात नाही. त्यांच्या जनुकीय रचनेच्या आधारावरच औषधोपचार केला जातो.ही उपचार पध्दत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असते. त्यामुळे प्रत्येक रुग्णावर औषधांचा अधिक प्रभाव परिणाम दिसून येतो. या संशोधनात्मक अभ्यासामुळे आपल्याला अनुवंशिकतेमुळे भविष्यात कोणते आजार उद्भवतील याचे निदान आज करता येते. त्यानुसार भविष्यात होणारे हे आजार होऊ नयेत यासाठी मार्गदर्शन केले जाते. त्याचप्रमाणे होमिओपथी औषधही दिली जातात. तसेच आपली जीवन जगण्याची पद्धत, आपल्या सवयी ज्या आपल्याला भविष्यात होणाऱ्या आजाराला कारणीभूत आहेत त्या बदलण्यासाठी मदत केली जाते. त्यामुळे अनुवंशिकतेचा आजारापासून आपल्याला सुटका मिळण्याची शक्यता वाढते. म्हणूनच रुग्ण या सोप्या जनुकीय चाचणी सह आजारांवर नियंत्रण ठेवू शकतात. ही चाचणी वेदनाविरहित असून भारतातील सर्व डॉ. बत्राज क्लिनिक मध्ये वाजवी दरात उपलब्ध आहे. ही चाचणी रुग्णांना जीवनशैली आजारांवर नियंत्रण ठेवण्यास सोबतच त्यावर उपचार करण्याची संधी देते. डॉ. बत्राज जेनोहोमिओपॅथिक बँक नावाची रुग्णाच्या जेनोमीक डेटाची बँक देखील स्थापित करण्यात येणार आहे. रुग्णांसाठी कोणती उपचार पद्धती अधिक प्रभावी असेल किंवा भविष्यात ते कोणत्या उपचार पद्धतीला प्रतिसाद देऊ शकतील याचा अंदाज करण्यासाठी या जेनोमीक डेटाचा उपयोग होणार आहे. यामुळे प्रत्येक रुग्णाला सर्वोत्तम व जलद उपचार मिळेल.जेनो होमिओपॅथीच्या माध्यमातून उपचार पद्धतीच्या भवितव्या मध्ये क्रांतीकारी बदल घडवून आणले असल्याने डॉ बत्राज नेहमीच तंत्रज्ञान संशोधन व भावी थेरपीमध्ये अग्रस्थानी राहिले आहे. रुग्णांना तंत्रज्ञान दृष्ट्या उच्च दर्जाची उपचार पद्धत सादर करण्याचा प्रयत्न डॉ. बत्रा यांनी केला आहे. या संशोधनामुळे भारतातील करोडो लोकांना याचा फायदा होणार आहे. अनुवंशिक आजारांमुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होण्यास मदत होणार आहे असे डॉ. जिनेश्वर कपाळे यांनी सांगितले. डॉ. बत्राज ज्यांची जगभरात चारशेहून अधिक होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि जवळपास एक दशलक्ष उपचार केलेल्या या ब्रँडला नुकताच ‘इंडियाज मोस्ट ब्रँड ऑफ द ईयर’ पुरस्कार मिळाला आहे असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला डॉ. सुजाता चौगुले यांच्यासह होमिओपथिक तज्ञ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!