स्टार प्रवाहच्या विठूमाऊली मालिकेतून उलगडणारवारीचा इतिहास

 

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम यांच्यापालख्यांची पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.ज्ञानोबा-तुकोबा आणि विठूनामाचा गजर करत वैष्णवतल्लीन होऊन रिंगण करत, मुक्काम करत पायीपंढरपूरला आषाढीला भेटणार आहेत. वारीचा हाच सगळाप्रवास स्टार प्रवाहच्या विठूमाऊली या मालिकेतूनउलगडणार आहे. आईला संकटातून वाचवण्यासाठीनिघालेल्या पुंडलिकाची वारी पूर्ण होणार का, हे’विठूमाऊली’ मालिकेत पहायला मिळणार आहे.पुंडलिकाच्या आईवर संकट आलं आहे. त्यातून तिलाबाहेर काढण्यासाठी विठ्ठल पुंडलिकाला पायी लोहदंडक्षेत्री यायला सांगतात. पुंडलिकाचा हा प्रवास पूर्ण झालातर कलीच्या अस्तित्त्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे.त्यामुळे कली पुंडलिकाच्या प्रवासात अडथळे आणतो.कलीने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी पुंडलिकाला विठ्ठल कशाप्रकारे मदत करतो आणि पुंडलिक लोहदंड क्षेत्रापर्यंत पोहोचतो का, या प्रश्नाचं उत्तरपुढील काही भागांतून मिळेल. तसंच डोक्यावर तुळस का घेतली जाते, गंधाचा टिळा कालावला जातो, रिंगणाचे खेळ का खेळतात अशा वारीतल्यापरंपरांमागील कारणंही कळणार आहेत. त्यासाठी नचुकता पहा ‘विठूमाऊली’ सोमवार ते शनिवार सायंकाळी ७वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!