
कोल्हापूर : पत्रकारांची शिखर संस्था असलेल्या कोल्हापूर प्रेस क्लब 2018 – 19 कालावधीकरिता अध्यक्षपदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली. यामध्ये दैनिक पुढारीचे पत्रकार विजय पाटील यांची कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानुसार आज इतर पदाधिकारी निवडी पार पडल्या. यामध्ये उपाध्यक्ष समीर मुजावर (दैनिक नवभारत) कार्याध्यक्ष सदानंद पाटील (दैनिक सकाळ) सचिव बाळासाहेब पाटील (दैनिक महाराष्ट्र टाइम्स) खजानिस इकबाल रेठरेकर (एस न्यूज) सहसचिव सुनील काटकर (टीव्ही 9 मराठी) माध्यम समनव्यक अक्षय थोरवत(दैनिक महान कार्य ) यांची निवड निवडणूक पर्यवेक्षक संजय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अक्षय थोरवत हे स्पीड न्यूज चे मुख्य प्रतिनिधी आहेत.तसेच कार्यकारणी यामध्ये रणधीर पाटील (दैनिक पुढारी) सुनील पाटील (दैनिक सकाळ) विठ्ठल बिरंजे (दैनिक तरुण भारत) शशिकांत मोरे (दैनिक तरुण भारत ) प्रदीप शिंदे (दैनिक लोकमत) एकनाथ पाटील (दैनिक लोकमत) उदयसिंह पाटील (दैनिक महाराष्ट्र टाइम्स),चंद्रकांत पाटील(दैनिक पुण्यनगरी) वैभव गोंधळी(दैनिक पुण्यनगरी) संदीप पाटील (जय महाराष्ट्र) संभाजी भोसले (दैनिक रणझुंजार) संजय साळवी (दैनिक समाज),दिपक सूर्यवंशी(बी न्यूज ) आणि तय्यब अली (छायाचित्रकार) याप्रमाणे कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. पत्रकारांच्या कल्याणाचेच काम सर्व पदाधिकारी व कार्यकारणी संचालक करतील अशी ग्वाही यावेळी अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली.
Leave a Reply