भागीरथी महिला संस्था व स्टेप अप फाऊंडेशनच्यावतीने कळी उमलताना कार्यक्रम

 
कोल्हापूर: वयात येताना आणि वयात आल्यानंतरही मुलींनी आरोग्य विषयक कोणती काळजी घ्यावी, याविषयी भागिरथी महिला संस्था मुलींचं प्रबोधन करत आहे. गेल्या ८ वर्षात २५ हजाराहून अधिक शाळकरी मुलींचं या कार्यक्रमाद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. यातूून होणार्‍या जनजागृतीमुळं महिलांचं आरोग्य चांगलं रहाण्यास मदत होत आहे, असं प्रतिपादन भागिरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी आज केलं.भागीरथी महिला संस्था आणि स्टेप अप इंडिया फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमानं उषाराजे हायस्कूलधील विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महाराष्ट्राचा पॅडमन अशी ओळख असणार्‍या स्वप्निल शिर्सेकर यांनीही या कार्यक्रमात शाळकरी मुलींना वयात येताना कोणती काळजी घ्यावी. आहार, आचार-विचार कसा असावा, याविषयी काही महत्वाच्या टीप्स दिल्या.  
पौगंडावस्थेत पदार्पण करताना मुलींमध्ये शारीरिक बदल होत असतात. या वयात मुलींना वैचारिक समज अल्प असते. त्यामुळं या वयात त्यांना मार्गदर्शनाची गरज असते. याविषयी गेल्या ८ वर्षांपासून भागीरथी महिला संस्थेच्यावतीनं कळी उमलताना या कार्यक्रमाद्वारे मुलींना मार्गदर्शन केलं जातंय. आज ताराराणी विद्यापीठ संचलित उषाराजे हायस्कूलमध्ये ७ वी ते १० वीच्या वर्गातील विद्यार्थिनींना भागिरथी महिला संस्था आणि स्टेप अप इंडिया फाऊंडेशन यांच्यावतीनं मार्गदर्शन करण्यात आलं. महाराष्ट्राचा पॅडमन अशी ओळख असणारा स्वप्निल शिर्सेकर हा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण होता. पुरुषांनी महिलांच्या आरोग्यविषयक समस्या समजून घेतल्या तर खर्‍या अर्थानं स्त्री-पुरुष समानता येईल. सहनशीलता हा स्त्रियांचा खरा दागिना असला तरी सध्याच्या धावपळीच्या युगात ही सहनशीलता संपुष्टात येत असल्याचं चित्र दिसून येतंय. त्यामुळं महिलांनी सुध्दा वास्तव समजून घेतलं पाहिजे. समाजात एक आदर्श नागरिक घडवण्यासाठी आई-वडिलांनी आपल्यासाठी असीम त्याग गेलेला असतो, त्या त्यागाची आठवणसुध्दा मुलींनी ठेवली पाहिजे, असं सौ. अरुंधती महाडिक यांनी स्पष्ट केलं. गेल्या ८ वर्षात भागिरथी महिला संस्थेनं २५ हजाराहून अधिक शाळकरी मुलींचं कळी उमलताना या कार्यक्रमाद्वारे प्रबोधन केलंय. यातूून होणार्‍या जनजागृतीमुळं महिलांचं आरोग्य चांगलं रहाण्यास मदत होत आहे, असंही सौ. महाडिक यांनी नमूद केलं. महाराष्ट्राचा पॅडमन आणि स्टेप अप इंडिया फाऊंडेशनचा अध्यक्ष स्वप्निल शिर्सेकर यांनी दैनंदिन जीवनातील उदाहरणं हलक्या-फुलक्या पध्दतीनं देऊन मुलींना मार्गदर्शन केलं. वयात येत असताना कोणती काळजी घेतली जावी, याचं प्राथमिक ज्ञानसुध्दा अजून दिलं जात नाही, हे वास्तव आहे. मासिक पाळी संबंधी जे काही गैरसमज आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. या दिवसांबद्दल आपल्या पालकांशी मुलींनी मनमोकळा संवाद साधला पाहिजे, असं शिर्सेकर यांनी स्पष्ट केलं. जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांचंही यावेळी भाषण झालं. कार्यक्रमाला पृथ्वीराज महाडिक, नगरसेविका सविता भालकर, शाळेच्या मुख्याध्यापिका एम. व्ही. जाधव, उपमुख्याध्यापिका ए. यू. साठे, पर्यवेक्षक व्ही. डी. जमेनीस, एस. डी. चौधरी, शिक्षिका एम. यू. बीडकर, पी. एम. तळेकर, आझाद नायकवडी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!