नेहरूनगर विद्यामंदिर शाळेत स्वच्छता मोहीम संपन्न

 

 कोल्हापूर : येथील नेहरूनगर शाळेमध्ये रविवारी पर्यावरण दिना निमित्त शाळेच्या आवारात रोग राई पसरू नये म्हणून आमदार अमल महाडिक व भाजपचे जिल्हा अध्यक्ष संदीप देसाई यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली .यावेळी शाळेचे मैदान व आजूबाजूचा परिसर स्वछ करण्यात आला.
कोल्हापुर शहर अध्यक्ष सतोष लाड ,प्रितम यादव,सुधीर देसाई,संतोष माळी अक्षय भालकर यांनी याचे आयोजन केले होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शहाजी घोरपडे नगरसेविका ललीता बारामते,रामदास वास्कर,वहिदा मोमीन , अनिल साळोखे,विष्णू देसाई ,संजय पाटील,सिमा बारड,कविता चव्हाण,श्रद्धा जोगळेकर काजी काकी आलोच ग्रुपचे कार्यकर्ते अक्षय कुंभार,किशोर जाधव,नागेश देसाई,स्वप्निल ठोबळे सागर कदम,रवि शिंदे व सर्वपालक ,शिक्षक ,बालवाडी वर्ग यानी सर्वानी एकत्र येऊन सर्व कचरा,घाण,झुडपे किचकट सर्व साफ करून शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!