
कोल्हापूर: आज प्रथम संचलित , बाबुराव भोसले प्रशिक्षण केंद्र , कोल्हापूर येथे विद्यार्थी व पालक सभा चे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात प्रशिक्षण घेत असलेले प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालक व प्रशिक्षण घेऊन नोकरी करीत असलेले निवडक विद्यार्थी उपस्थित होते .कार्यक्रमास सौ .अरुंधती महाडिक – संस्थापक भागिरथी महिला संस्था संपतराव पाटील – ग्राहक पंचायत समिती सदस्य. शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते.नावेद मुजावर – आय टी फिल्ड एक्सपर्ट आणि उद्योजक. आनंदराव भोसले – प्रथम संलग्न और सामाजिक कार्यकर्ते.आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात सुरुवातीला वृक्षाला पानी घालून कार्यक्रम ची सुरुवात केली तर मान्यवरांचे स्वागतही वृक्ष देऊन करण्यात आले.प्रास्ताविकामध्ये प्रथम संस्थेची ओळख व कोल्हापूर मधील संस्थेच्या कार्यक्रमाचा अहवाल प्रथम चे जिल्हा समनव्यक सुधाकर भदरगे यांनी सादर केला.
शिकत असलेले प्रशिक्षणार्थी व त्यांचे पालक यांनी प्रशिक्षण बदल ,संस्थेबदल अनुभवातून आभार मानले.
जे युवक युवती जॉब करीत आहेत त्यांनी आपले अनुभव शेर केले . त्याचबरोबर अशा विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
काही अवॉर्ड्स ही देण्यात आले. आदर्श विध्यार्थी विध्यार्थिनी शाहू महाराज जयंती निमित्त भाषण स्पर्धा घेण्यात आली होती त्यातील क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. टू व्हिलर ड्रायविंग कमी मेकॅनिक कोर्स करीत असलेल्या युवतींचे वर्सेटाइल कंपनी गोकुळ शिरगाव येथे निवड झाल्याबद्दल त्यांचा ही सत्कार करण्यात आला. मान्यवर यांचे मनोगत मध्ये सौ अरुंधती महाडिक वहिनींनी भागीरथी संस्थेबदल व खासदार साहेबांच्या कार्य बद्दल माहिती देऊन भविष्यात जिल्ह्यातील बेरोजगार युवक युवतींना सक्षम करण्याच्या अनुषंगाने लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली. व संस्थेच्या कार्याचे अभिनंदन केले मुजावर यांनी करियर कडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा याबाबत मार्गदर्शन केले. श्री संपत पाटील यांनी प्रशिक्षण आणि आपली मानसिकता याबद्दल मार्गदर्शन करून संस्थेच्या कार्याबद्दल, सुविधा व गुणवत्ता याबद्दल कौतुक केले. अध्यक्षीय भाषणामध्ये भोसले सरांनी संस्थेचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना व संस्थेला पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या.. विद्यार्थ्यांच्या नोकरी बद्दल व आज शिका उद्या फी भरा या योजनेबद्धल माहिती प्लेसमेंट कॉर्डिनेटर प्रमोद शिंदे यांनी माहिती दिली , सूत्रसंचालन प्रशिक्षक कु अंजली नलवडे यांनी केले तर आभार सेंटर च्या समनव्यक सौ करुणा दळवी यांनी मानले..
Leave a Reply