गरजू रुग्णांप्रती असलेली आपली वचनबद्धता दर्शवित सह्याद्री हॉस्पिटल्स ने पाचशे बालकांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंर्तगत पूर्ण करण्याचा टप्पा नुकताच पार केला. एप्रिल 2014 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करणे सह्याद्री हॉस्पिटल्सने सुरु केले असून अवघ्या चार वर्षांमध्येच 4000 हृदय शस्त्रक्रिया आणि 500 या बालकांच्या हदयाच्या शस्त्रक्रिया तसेच 500 पेडियाट्रिक कार्डियाक इंटरव्हेंशन्स (उपकरणांद्वारे हदयामधील छिद्र बुजविण्याची प्रक्रिया) केल्या आहेत,अशी माहिती सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन जिमखाना,हडपसर,नगर रोडचे प्रमुख डॉ.केतन आपटे यांनी दिली.आपल्या क्षमतेच्या परिसीमा ओलांडत रूग्णांवर उपचार करणे,त्यांना गुंतागुंतीच्या जोखीमेतून बाहेर काढणे व त्यांना लवकर बरे करणे यासाठी सह्याद्री हॉस्पिटल्स प्रयत्नशील आहे.याप्रसंगी या महत्त्वाच्या टप्प्याविषयी माहिती देण्याकरिता सह्याद्री हॉस्पिटल्समधील बालहदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगांवकर,भूलतज्ञ डॉ.शंतनू शास्त्री,सल्लागार कार्डिओथोरॅसिक सर्जन डॉ.राजेश कौशिश आणि डॉ.महेंद्र बाफना आदी उपस्थित होते.सह्याद्री हॉस्पिटल्सचे बालहदयरोग तज्ञ डॉ.पंकज सुगांवकर म्हणाले, गरजू रूग्णांपर्यंत पोहचण्याकरिता आम्ही पुण्याबाहेरही नियमितपणे तपासणी शिबिरे घेत असतो विशेषतः मराठवाड्यात. आम्ही दिवसाला 200 रुग्णांना तपासतो आणि 150 एको प्रक्रिया करतो. एकदा तपासणी झाल्यानंतर आम्ही सह्याद्री हॉस्पिटल्स येथे गरजू रुग्णांना त्यांच्या कागदपत्रांबद्दल मार्गदर्शन करतो. एकदा आम्ही आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे तपासल्यावर या शस्त्रक्रिया विनामूल्य केल्या जातात.
सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल डेक्कन जिमखाना येथे 1 ते 15 जुलै 2018 दरम्यान मोफत हदय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरादरम्यान बालरोग हदयतज्ञांद्वारे मोफत सल्ला दिला जाईल,अशी माहिती डॉ.केतन आपटे यांनी दिली.
Leave a Reply