
कोल्हापूर : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे विचार शिवसैनिकांवर बिंबवले असून, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या प्रश्नासह शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून गेल्या महिन्यात आमदार राजेश क्षीरसागर यांच्या आमदार फंडातून शहरातील शाळांना मोफत संगणक संचाचे वाटप करण्यात आले. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आणि कोल्हापूर युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने शहरातील २१ कॉलेज मधील ११ वी ते पदवीपर्यंतच्या प्रत्येकी २०० गरजू विध्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे, अशी माहिती आज आमदार राजेश क्षीरसागर यांनी शिवसेना शहर कार्यालय, शनिवार पेठ, येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई आणि युवा सेनेच्या वतीने शहरातील २१ कॉलेज मधील ११ वी ते पदवीपर्यंतच्या प्रत्येकी २०० गरजू विध्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरामध्ये शहरातील प्रतेक कॉलेजवर युवासेनेचा पेंडॉल असणार आहे. याठिकाणी गरजू विध्यार्थ्यांनी येवून आवश्यक कागदपत्रे सादर करून योजनेचा अर्ज भरणे आवश्यक आहे. याकरीता प्रत्तेक कॉलेजवर युवा सेनेच्या वतीने पेंडॉल टाकण्यात येणार असून, याठिकाणी नावांची नोंदणी करण्यात येणार आहे. याचे माहितीपत्रक व फलक प्रत्तेक कॉलेजवर युवा सेनेच्या वतीने लावण्यात आले आहेत. शहरातील कॉलेजवर कोणत्या दिवशी अर्ज मिळणार याची यादी खालीलप्रमाणे आहे.
*• मंगलवार दि.१७ जुलै २०१८*
o स्वामी विवेकानंद कॉलेज व न्यू मॉडेल कॉलेज वेळ सकाळी १० ते सायं.५ पर्यंत
o न्यू कॉलेज व महाराष्ट्र ज्यू. कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत
o कॉमर्स कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत
o डी.डी.शिंदे सरकार कॉलेज व विद्यापीठ ज्यू. कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. २ पर्यंत
*• बुधवार दि.१८ जुलै २०१८*
o कै.बाळासाहेब खराडे कॉलेज वेळ सकाळी ८ ते दु. २ पर्यंत
o कमला कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत
o मेन राजाराम ज्युनि. कॉलेज वेळ सकाळी ८ ते दु. २ पर्यंत
o एम.एल.जी. ज्युनि. कॉलेज वेळ सकाळी ८ ते दु. २ पर्यंत
*• गुरुवार दि.१९ जुलै २०१८*
o राजर्षी शाहू ज्युनि. कॉलेज, जुना बुधवार पेठ वेळ सकाळी ८ ते दु.२ पर्यंत
o शाहू कॉलेज, सदर बझार वेळ सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
o गोपालकृष्ण गोखले कॉलेज वेळ सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत
o पद्माराजे ज्युनि. कॉलेज व सौ.स.म.लोहिया ज्युनि.कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत
o शहाजी कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत
*• शुक्रवार दि.२० जुलै २०१८*
o शाहू दयानंद ज्युनि. कॉलेज, मंगळवार पेठ वेळ सकाळी ८ ते दु.२ पर्यंत
o महावीर कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. ५ पर्यंत
o के.एम.सी. कॉलेज वेळ सकाळी ८ ते सायं. २ पर्यंत
*• शनिवार दि.२१ जुलै २०१८*
o राजाराम कॉलेज वेळ सकाळी १० ते सायं.५ पर्यंत
वरील पद्धतीने ज्या त्या दिवशी विध्यार्थ्यांच्याकडून अर्ज भरून घेतले जाणार आहेत. गरजू विध्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह युवासेनेच्या पेंडॉल वर येवून अर्ज भरावेत, असे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.
ते पुढे म्हणाले, देशाच्या उन्नतीकरिता युवा वर्गाची आणि विध्यार्थांचे सबलीकरण होणे गरजेचे आहे. त्यांच्या शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ होणे गरजेचे असून, हि गरज ओळखून विध्यार्थी आणि युवा वर्गाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेने उचलली आहे. वर्षभरात युवा सेनेच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर सलग गेली १२ वर्षे विध्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, विध्यार्थ्याना विनाडोनेषण प्रवेश मिळावा यासाठी मोर्चा काढून प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले जात आहे. सलग आठ वर्षे “मैत्री युवा महोत्सव” सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश युवा वर्गास देण्यात येतो. यासह भारतीय संकृतीचे जतन व्हावे, आपली संस्कृती युवा वर्गावर बिंबावी याकरिता दरवर्षी “पारंपारिक दिवस” साजरा करून पारंपारिक वाध्याच्या गजरात युगपुरुषांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात येते. यासह वर्षभर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी कार्यक्रम, अंधशाळेतील विद्यार्थ्याना जेवण, वृद्धाश्रमास फळे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत असल्याची माहितीही आमदार राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिली.
Leave a Reply