
कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ आणिपरिसरातील क्रीडा विषयक सोयीसुविधा पाहण्यासाठीदि.18 ते दि.20 जुलै या कालावधीत राष्ट्रीय त्सिंघुआविद्यापीठ, तैवान येथील चैंग जूनई, लीन सियान सियैंग याक्रीडा विभागाच्या अधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ विद्यापीठासभेट देणार आहेत. परदेशी विद्यापीठ हे शिवाजीविद्यापीठामध्ये क्रीडा विषयक माहिती घेण्यासाठी भेट देणेहा विद्यापीठास नावलौकीक प्राप्त करून दिलेल्या सर्वआंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान आहे, अशी माहितीकुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर,वित्त व लेखाधिकारी श्री.व्ही.टी.पाटील उपस्थित होते.क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ.पी.टी.गायकवाडयांनी तैवान विद्यापीठाच्या शिष्टमंडळाच्या भेटीचे प्रयोजनस्पष्ट करताना म्हणाले, या भेटीमध्ये क्रीडा विभागाचीपहाणी, सराव केंद्र, क्रीडा सोयीसुविधा, मैदानांची पाहणी,तसेच शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील सर्वमहाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक क्रीडाविषयक माहितीचे आदानप्रदान करण्यासाठी आयोजितकेलेल्या कार्यशाळेसाठी उपस्थित राहणार आहेत. सदरतीन दिवसीय कार्यक्रमात विविध बाबींवर विचार विनिमयहोणार आहे.
या भेटीचा कार्यक्रम थोडक्यात असा – दि.18 जुलै: विद्यापीठाच्या नॅनो सायन्स अधिविभाग सभागृहामध्येसादरीकरण, विद्यापीठ परिसरामध्ये कब्बड्डीच्या प्रदर्शनीयसामन्याचे आयोजन, विद्यापीठातील खेळाच्या मैदानाचीपाहणी, विद्यापीठाच्या सिंथेटीक ट्रॅकची पाहणी, मोरेवाडीयेथील शांतिनिकेतन शाळेस भेट, शाहू कॉलेज, कोल्हापूरयेथील पोहण्याच्या तलावास भेट, विद्यापीठातीलमानव्यशास्त्र सभागृहामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचेआयोजन.
दि.19 जुलै : नागाळापार्क येथील सेंट झेवियर्सशाळेस भेट, नवीन राजवाडा येथील छ.शहाजी महाराजसंग्रहालयास भेट, मंगळवार पेठ येथील मोतीबाग तालीमपाहणी, तद्नंतर पन्हाळा किल्ला भेट.
दि.20 जुलै : विद्यापीठाच्या मानव्यशास्त्रसभागृहामध्ये क्रीडा विज्ञान या विषयावरील आंतरराष्ट्रीयकार्यशाळेचे आयोजन. तद्नंतर, कृती आराखडा बैठकीनेभेटीची सांगता.
Leave a Reply