
कोल्हापूर:शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे विचार शिवसैनिकांवर बिंबवले असून, शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे आणि युवा सेना अध्यक्ष मा. आदित्यजी ठाकरे युवा सेनेच्या माध्यमातून विध्यार्थ्यांच्या प्रश्नासह शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्याकरिता प्रयत्नशील आहेत. मुंबई येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट आणि कोल्हापूर युवा सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार राजेश क्षीरसागर यांच्या पुढाकाराने शहरातील २१ कॉलेज मधील ११ वी ते पदवीपर्यंतच्या प्रत्येकी २०० गरजू विध्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाची सुरवात दि. १७ जुलै रोजी करण्यात आली. शहरातील विविध महाविध्यालायातील गरजू विध्यार्थ्यानी या उपक्रमास उदंड प्रतिसाद दिला. आज आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज विध्यार्थ्याना राजाराम कॉलेज येथे नोंदणी अर्जाचे वाटप करून उपक्रमाचा सांगता समारंभ करण्यात आला.
श्री सिद्धिविनायक ट्रस्ट मुंबई आणि युवा सेनेच्या वतीने आयोजित या उपक्रमास विध्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून, पहिल्याच दिवशी शहरातील सात कॉलेजवर सुमारे १४०० विध्यार्थ्यांनी आपल्या नांवाची नोंदणी केली होती. गेल्या पाच दिवसात या उपक्रमा अंतर्गत स्वामी विवेकानंद कॉलेज, स्वामी विवेकानंद कॉलेज, न्यू मॉडेल कॉलेज, न्यू कॉलेज, महाराष्ट्र ज्यू. कॉलेज, कॉमर्स कॉलेज, डी.शिंदे सरकार कॉलेज, विद्यापीठ ज्यू. कॉलेज, कै.बाळासाहेब खराडे कॉलेज, कमला कॉलेज, मेन राजाराम ज्युनि. कॉलेज, एम.एल.जी. ज्युनि. कॉलेज, राजर्षी शाहू ज्युनि. कॉलेज, जुना बुधवार पेठ, शाहू कॉलेज, सदर बझार, गोपालकृष्ण गोखले कॉलेज, पद्माराजे ज्युनि. कॉलेज व सौ.स.म.लोहिया ज्युनि.कॉलेज, शहाजी कॉलेज, शाहू दयानंद ज्युनि. कॉलेज, मंगळवार पेठ, महावीर कॉलेज, के.एम.सी. कॉलेज या महाविध्यालयांवर युवा सेनेच्या वतीने पेंडॉल उभे करून विध्यार्थ्यांचे अर्ज संकलन करण्यात आले. शहरातील या विविध कॉलेजवर आजपर्यंत सुमारे दहा हजारांच्यावर विध्यार्थ्यांनी युवा सेना आयोजित पुस्तक उपक्रमास अर्जांची मागणी करण्यात आली. यातील गरजू ४२०० विध्यार्थ्यांना युवा सेनेच्या वतीने पुस्तक वाटप करण्यात येणार आहे. या पुस्तकांची किंमत सुमारे रुपये पंधराशे ते दोन हजारच्या आसपास असून, श्री सिद्धिविनायक ट्रस्ट साठी प्रत्तेक कॉलेज मागे रु. १५०० ही रक्कम आमदार राजेश क्षीरसागर फौंडेशनच्या वतीने भरण्यात आली आहे. या सर्व अर्जांचे संकलन करून त्या अर्जांची ऑनलाईन नोंदणी करण्यात येणार आहे. या सर्व पात्र गरजू विद्यार्थ्याना येत्या आठ दिवसात पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये युवा सेनेच्या वतीने आयोजित सदस्य नोंदणी अभियानासही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या उपक्रमात तब्बल पाच हजारच्यावर युवक युवतींनी युवा सेना सदस्य नोंदणी केली.
या सांगता समारंभ प्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी, युवा सेनेच्या या उपक्रमाची स्तुती करताना, युवासेना पदाधिकारी यांनी केलेल्या कामाचे अभिनंदन केले. या अभियानाच्या अंतर्गत सुमारे दहा हजार विध्यार्थ्यांनी मोफत पुस्तकांची मागणी केली होती. या सर्व विध्यार्थ्यांना पुस्तक मिळण्याच्या दृष्टीने श्री सिद्धिविनायक ट्रस्टच्या अध्यक्षांशी चर्चा करून वाढीव पुस्तकांनाचा लाभ देण्याबाबत प्रयत्न करणार आहे. युवा सेनेने ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविली असून, कोल्हापूर जिल्ह्यात अशा प्रकारचा उपक्रम पहिल्यांदाच पार पडत असल्याने युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे विशेष असे अभिनंदन करणे गरजेचे आहे. सलग गेली १२ वर्षे विध्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी, विध्यार्थ्याना विनाडोनेषण प्रवेश मिळावा यासाठी मोर्चा काढून प्रशासनाला जाग आणण्याचे काम केले जात आहे. सलग आठ वर्षे “मैत्री युवा महोत्सव” सांकृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभक्ती आणि व्यसनमुक्तीचा संदेश युवा वर्गास देण्यात येतो. यासह भारतीय संकृतीचे जतन व्हावे, आपली संस्कृती युवा वर्गावर बिंबावी याकरिता दरवर्षी “पारंपारिक दिवस” साजरा करून पारंपारिक वाध्याच्या गजरात युगपुरुषांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात येते. यासह वर्षभर लहान मुलांना शालेय साहित्य वाटप, अनाथ आश्रमातील मुलांच्या विरंगुळ्यासाठी कार्यक्रम, अंधशाळेतील विद्यार्थ्याना जेवण, वृद्धाश्रमास फळे वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, असे सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येत. येणाऱ्या काळात युवा सेनेच्या माध्यमातून प्रश्न विध्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचेहि त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान या प्रसंगी श्री. ऋतुराज राजेश क्षीरसागर, युवासेना शहरप्रमुख अविनाश कामते, चेतन शिंदे, पियुष चव्हाण, शैलेश साळोखे, प्रशांत जगदाळे, गुरु लाड, विश्वदीप साळोखे, योगेश चौगुले, अविनाश पाटील, ओंकार परमणे, कपिल सरनाईक, ओंकार तोडकर, अफान बागवान, अजिंक्य पाटील, युवराज भोसले, आदर्श जाधव, सौरभ कुलकर्णी, देवराज ढवळे, अक्षय पाटील, राज नड्डार, अभिजित गोयानी, आशिष गवळी, युवराज भोसले, अभिषेक पोवार, विनायक मंडलिक, आदी युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply