
कोल्हापूर : पर्यावरणावर अभ्यास करून त्याचे संरक्षण कसे करावे यासाठी गेली अनेक वर्षापासून कार्यरत असणारे रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेड चे अधिकारी सत्यजित विजय भोसले यांना भारतीय पर्यावरण मंडळ व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ ,इंडियन इन्स्टिट्यूट,असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ प्लास्टिक यांच्या वतीने पर्यावरण गौरव पुनस्काराने सन्मानित करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पुणे येथे 3 जुलै 2018 रोजी झालेल्या प्लास्टिक़चे प्रदुषण रोखणे यावर आधारित आयोजित विशेष कार्यक‘मात त्यांचा सन्मान करण्यात आला.
सत्यजित भोसले हे गेली अनेक वर्षे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने कार्य करीत आहेत. ओला व सुका कचरा वेगळा करून,सुका कचरा पूर्न:वापरात आणणे व ओल्या कचर्यापासून खतनिर्मिती करणे या विषयी ते विविध शाळा व संस्थांमधून मार्गदर्शन करीत आहेत. हा विषय त्यांनी सहजरित्या गणेशउत्सव,सायकल रॅली व विविध शेती प्रदर्शनामार्फत माहितीपत्रकांव्दारे समाजापर्यत पोहोचविण्याच्या प्रयत्न करीत आले आहेत. त्यांनी या विषयी मोठ्या प्रमाणात प्रबोधनाचे काम हाती घेतले आहे.
ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्यात्या ठिकाणी त्यांच्याकडून या विषयीचे मार्गदर्शन होत असते.कोल्हापूरमध्येही कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी हा विषय जनतेसमोर आणला आहे. त्यांचे हे कार्य पाहूनच त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.या मंडळांकडून ज्या ज्या व्यक्त्ती या पर्यावरण संरक्षणावर कार्य करीत आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.हे विधायक व प्रबोधनाचे कार्य आहे असे सत्यजित भोसले यांनी यावेळी बोलून दाखविले आहे.
Leave a Reply