
कोल्हापूर :धर्मकार्यासाठी समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे मत पंडित वि. गो. देसाई यांनी येथे केले.येथील श्रीमद जगदगुरू शंकराचार्य पीठाच्या ज्ञान या त्रैमासिकाचे प्रकाशन आज करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आचार्यांचा अवतार हा ज्ञानासाठीच होता. त्यामुळे पीठाच्या वतीने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. याच्या माध्यमातून पीठातील कार्यक्रमांची नोंद घेण्यात यावी.
महेंद्र इनामदार म्हणाले, ज्ञानाची व्याप्ती खूप मोठी आहे, त्या दृष्टीने पीठाच्या वतीने सुरू केलेल्या या त्रैमासिकात अध्यात्माविषयी खूप माहिती देता येईल. पीठाचे अध्यक्ष सुरेश कुलकर्णी यांनी पीठाच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. रामकृष्ण देशपांडे यांनी स्वागत केले. सचिव शिवस्वरूप भेंडे यांनी पीठाचे मुखपत्र असणारा हा अंक सुरू करण्याविषयीची पार्श्वभूमी स्पष्ट केली. या मासिकात पंडित वि. गो. देसाई, महेंद्र इमानदार, यज्ञेश्वर स्वामी शास्त्री आदी लिखाण करणार आहेत, तर भक्तांच्या शंकांचे समाधान स्वतः स्वामीजी करणार आहे. त्यासाठी ज्या कुणा भक्तांना काही शंका असल्यास पीठात आणून दिल्यास त्यांचे निरसन या अंकाच्या माध्यमातून करता येईल, असे सांगितले. नंदकुमार मराठे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते.
Leave a Reply