
कोल्हापूर: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरातील दसरा चौक येथे ठिय्या आंदोलन सुरु आहे, सदर ठिय्या आंदोलनास व मराठा समाजास आरक्षण मिळावे या मागणीस माझा पाठींबा व्यक्त करत आहे. मी, महेश बाळासाहेब जाधव प्रामुख्याने गेली 25 वर्षे भाजपाचा कार्यकर्ता, सरचिटणीस, अध्यक्ष या नात्याने शिवाजी पेठेतील प्रतिष्टीत व जुन्या अशा तटाकडील तालीम मंडळ या द्वारे सामाजिक कार्य करत आहे. एक मराठा समाजातील तरुण कार्यकर्ता या नात्याने मी आजपर्यंत मराठा समाजास आरक्षण मिळण्याच्या आंदोलन प्रक्रियेत व्यक्तिश: तसेच भाजपा पक्ष अध्यक्ष या नात्याने सक्रीय होतो. सर्व प्रकारचे मोर्चे, आंदोलन, बंद यामध्ये माझा सहभाग, सहकार्य होते आणि राहील.
या आंदोलनाचा एक भाग म्हणून सध्या दसरा चौक येथे मराठा समाजास आरक्षण मिळण्यासंदर्भात ठिय्या आंदोलन सुरु आहे.आज या ठिकाणी सर्व पक्ष, संघटना, तालीम संस्था एकत्र येऊन आपला पाठींबा देत आहेत हे कोल्हापूरचे एक वेगळेपण आहे. या ठिकाणी न्यायासाठी, समाज उद्धारासाठी सर्वजण एकत्र येतात याच अनुशंगाने मा.खा.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अत्यंत महत्वाचे मार्गदर्शन व विचार प्रकट केले आहेत व समाजाला आरक्षण मिळण्यासाठी, सरकारने “घटनेत” बदल करावा अशी योग्य मागणी केली, त्यांचा अनुभव व सल्ला याठिकाणी मराठा समाजाला प्रेरक ठरला, तेही या दसरा चौकातील ऐतिहासिक मंचावर, सरकार व भाजपा मराठा समाज आरक्षण या विषयावर अत्यंत गंभीर आहे. त्याचमुळेच गेली पंधरा वर्षे जी, मागणी धिमीगतीने व केवळ चर्चेत होती टी, मा.मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कुशल व निर्णय घेण्याच्या वृत्तीमुळे शेवटच्या टप्प्यात आली आहे. मी, व्यक्तिश: त्यांच्याशी या विषयात चर्चा केली आहे. सरकारने २७०० पानाचे प्रतिज्ञा पत्र हायकोर्टात सादर करून, १६% आरक्षण देणे विषयी आपला मनोदय पुढे केला, याच प्रक्रियेत न्यायालयीन आदेश मा.सर्वोच्च न्यायालय यांनी दिल्यानंतर सरकारने अतितातडीने व आपली निष्ठा दाखवत मागासवर्गीय आयोगास ताबडतोब सर्व व्यवस्था देऊन सदर अहवाल देण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवाल येताच तत्काळ निर्णय घेतला जाईल असे मुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण प्रश्नी विशेष अधिवेशन बोलावण्याचे निश्चित केले आहे. सरकार याच्यावर थांबले नाही तर, EBC ९ लाखांवर देऊन, वसतीगृह सवलत देऊन, आण्णासाहेब पाटील महामंडळास भरघोस निधी देऊन, मराठा समाज, सशक्त व परिपूर्ण कसा होईल याची पावले टाकली आहेत.
मी, वैयक्तिक रित्या, माझा पक्ष व सामाजिक जबाबदारीसह काल, आज, उद्या मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आग्रही आहे व राहणारच. नुकतेच जिल्याचे पालकमंत्री यांनी, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष यांची मंत्री गटासोबत भेट घेऊन, आयोगाने लवकरात लवकर अहवाल द्यावा, असे निवेदन दिले आहे. त्यामुळे पक्षाची, सरकारची भूमिका, निती, नियत अत्यंत स्वच्छ व सकारात्मक आहे. खुद्द राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी याविषयी लक्ष घातले आहे.
मला विश्वास आहे भाजपा सरकार याविषयी यशस्वी मार्ग काढेल, यासाठी मी देवस्थान समिती अध्यक्ष व मराठा समाजातील बांधव या नात्याने आई जगदंबेच्या चरणी साकडे घालतो, लवकरात लवकर मराठा समाजास आरक्षण मिळू दे, मी यासाठी सदैव तत्वर आहे, सर्वांसोबत, एकत्र येऊन या लढाईत माझा सहभाग माझ्या पक्षाचे योगदान राहील याची ग्वाही देतो, मी रस्त्यावर, पक्ष स्तरावर, सरकार स्तरावर, माझी सर्वशक्ती, वेळ, साधन, संपर्क, तन, मन, धन वाहून मराठा समाज उन्नती, सुरक्षा, अधिकार या भावनेसाठी सोबत कार्यात राहीण. या विषयी पाठींबा व्यक्त करणेसाठी सक्रीय सहभाग व्यक्त करणेसाठी सदर निवेदन प्रसिद्ध केले आहे.
Leave a Reply