
कोल्हापूर: ‘प्रसन्ना ग्रुप पर्पल ट्रिप्स’ च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक पर्यटन स्थळे वेगवेगळ्या सहलींचे आयोजन कोल्हापुरातून करण्यात येणार आहे. अष्टविनायक दर्शन भीमाशंकर सह, कोकण दर्शन, पंच ज्योतिर्लिंग दर्शन, अकरा मारुती कोल्हापुरातून, अक्कलकोट गाणगापूर दर्शन, या यासह अनेक महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील सहलींचा समावेश असणार आहे अशी माहिती पर्पल ट्रिप्स चे प्रमुख संजय नाईक आणि प्रसन्ना हॉलिडेज चे शाखाप्रमुख पराग भोपळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. गेले कित्येक वर्ष पर्यटकांचे समाधान हेच उद्दिष्ट ठेवून प्रसन्ना हॉलिडेज कार्यरत आहे. या माध्यमातून देशासह परदेशातील पर्यटकांनी याचा मनसोक्त आनंद घेतला आहे. यापूर्वी अष्टविनायक दर्शन सहल पुण्यातून जात होती. त्यामुळे कोल्हापुरातील पर्यटकांना पुणे येथे यावे लागत होते. पण कोल्हापुरातूनच अशा सहली आयोजित केल्या मुळे पर्यटकांना जास्त सोयीस्कर होणार आहे. ही सहल दर शुक्रवारी कोल्हापूरहून निघणार आहे. यामध्ये भीमाशंकर दर्शन ही पर्यटकांना घेता येणार आहे. तसेच कोल्हापूरमधील पर्यटनाला चालना देण्याकरता संपूर्ण जिल्ह्यातील तसेच शहरातील एक दिवसीय सहलीचे ही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पन्हाळा, जोतिबा, कणेरीमठ दर्शन यांचा समावेश असणार आहे.
आरामदायक प्रवास, स्वच्छ राहण्याची व्यवस्था, महाराष्ट्रीयन भोजन, अनुभवी सहल व्यवस्थापन अशा सेवा अंतर्भूत केल्या आहेत. तरी इच्छुकांनी प्रसन्ना हॉलिडेजच्या न्यू शाहूपुरी येथील कार्यालयात अथवा वेबसाईट वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply