
खासदार धनंजय महाडीक यांनी मालवाहतूकदारांच्या संपाबाबत संसदेत प्रश्न उपस्थित केला आणि सरकारनं या संपावर त्वरीत तोडगा काढण्याची मागणी केली. त्यानंतर सरकारने मालवाहतूकदारांच्या पन्नास टक्के मागण्या मान्य केल्या. खास. महाडीक यांच्यामुळेच ही संपाची कोंडी फुटल्याचे गौरवोद्गारकाढत आज कोल्हापुरातील वाहतूकदारांच्या सुमारे २२ हून अधिक संघटनांनी खासदार महाडीक यांचं अभिनंद केलं. संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी जोरदार जल्लोष केला.
इंधन दरातील वाढ मागे घ्यावी, देशभर टोलचा दर एकसमान असावा, या आणि अन्य मागण्यांसाठी व मालवाहतूकदारांनी संप पुकारला होता. गेल्या आठ दिवसात संपाची तीव्रता वाढल्यानं जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होण्याची शक्यात होती. ही बाब लक्षात घेऊन खासदार धनंजय महाडीक यांनी संसदेमध्ये मालवाहतूकदारांचे प्रश्न मांडले होते. तसेच या संपावर तातडीनं तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यानंतर आंदोलकांशी चर्चा करत सरकारने ५० टक्के मागण्या मान्य केल्या. खासदार महाडीक यांच्यामुळेचं या लढ्याला बळ मिळालं आणि सरकारने हा प्रश्न सोडवल्याची भावना व्यक्त करत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २२हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी आज एकत्र आले. खासदार महाडीक यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत पदाधिकार्यांनी खासदार महाडीक यांचे आभार मानले. हे मालवाहतूकदारांच्या पाठीशीठामपणे उभे राहील्याचे गौरगोद्गार लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी काढले. याप्रसंगी बॉक्साईट वाहतूक संघटना, कोल्हापूर वाहतूक संघटना नेर्ली तामगाव डंपर वाहतूक संघटना, राजर्षी शाहू मार्केट यार्ड टेंपो संघटना, गांधीनगर गुड्स मोटरमालक संघ, ट्रान्सपोर्ट असोसिएशन ऑफ नागाव शिरोली यासह २२ हून संघटनांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply