
सुखी आयुष्याचा कानमंत्र देणाऱ्या ‘देवा’सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. महाराष्ट्राचा सुपरस्टार आणि लाखो मराठी युवकांचा स्टाईल आयकॉन अंकुश चौधरी या सिनेमातून देवाच्या रुपात आपल्या भेटीला येईल. ‘देवा एक अतरंगी’ या चित्रपटाच्या नावाप्रमाणेच अंकुश या सिनेमात अतरंगी लूकमध्ये दिसेल. या चित्रपटात अंकुशसोबतच तेजस्विनी पंडित, स्पृहा जोशी,डॉ. मोहन आगाशे, पॅडी कांबळे अशी तगडी स्टारकास्ट आहे.
PROMO: https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/2132846940300256/
‘देवा’ सिनेमाच्या कथेला खूप वेगवेगळे आणि रंगीबेरंगी पदर आहेत. मनोरंजनासोबतच आयुष्याचं गमक मांडणारा हा सिनेमा,प्रत्येकाला आपल्या अस्तित्वाविषयी विचार करण्यास भाग पाडतो. मुरली नलप्पा यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.तेव्हा या अतरंगी देवाची न्यारी दुनियाअनुभवायची असेल तर ‘देवा’ सिनेमाचा वर्ल्डटेलिव्हिजन प्रीमियर पाहायला विसरु नका ९ सप्टेंबरला दुपारी १ आणि सायंकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.
Leave a Reply