

कॉलेज तरुणांना लुभावणा-या या गाण्याचे बोल अवधूत गुप्तेने लिहिले असून, उडत्या लयीच्या या गाण्याला संगीतदेखील त्यानेच दिले आहे. तसेच आदर्श शिंदे आणि रोहित राऊतने या गाण्याला आपल्या मस्तीभऱ्या आवाजाने रंग चढवला आहे. राहुल-संजीव जोडीचे दमदार नृत्यदिग्दर्शन असलेले हे गाणे प्रेक्षकांनाही बेभान नाचवण्यास यशस्वी ठरत आहे. या गाण्याबरोबरच, सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतिक लाड या सिनेमातील प्रमुख कलाकारांच्या अभिनयाचा डबल धमाका पाहण्यासाठीदेखील त्यांचे चाहते उत्सुक झाले आहेत.
शाळेतून कॉलेजमध्ये गेलेल्या या तिघांची गोष्ट सांगणाऱ्या ‘बॉईज २’ चे दिग्दर्शन विशाल देवरुखकर यांनी केले असून, ऋषिकेश कोळीने संवादलेखन केले आहे. तसेच लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे आणि संजय छाब्रिया यांनी या सिनेमाच्या निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. शिवाय, इरॉस इंटरनेशनलद्वारे ‘बॉईज २’ चित्रपटाचे जागतिक स्तरावर वितरण देखिल केले जाणार आहे
Leave a Reply