
कोल्हापूर : मानाच्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या सुरवातीलाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्का बुक्की केली. या प्रकाराचा महापौर व उपमहापौर यांनी निषेध व्यक्त केला.गणेश विसर्जन मिरवणुकीला कोल्हापूरचा मनाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या गणपतीच्या पूजनाने सुरवात होते. या वेळी पालकमंत्री, महापौर, उपमहापौर, पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती असते. पालखी पूजन आणि श्रींच्या आरतीनंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या सुरक्षा रक्षकांनी महापौर शोभा बोन्द्रे आणि उपमहापौर महेश सावंत यांना धक्का बुक्की केली.या वेळी येथे उपस्थित असणाऱ्या अनेक माध्यम कर्मीना देखील पोलिसांच्या ह्या अरेराविचा सामना करावा लागला. मिरवणुकीच्या सुरवातीलाच हा प्रकार घडल्यामुळे काही काळासाठी परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते
अशी अरेरावी कोल्हापूरमध्ये आजपर्यंत कधीच झाली नाही आहे. याचा मी निषेध करते.
– शोभा बोन्द्रे , महापौर
गेली अनेक वर्ष चालत आलेल्या ह्या परंपरेला आज गालबोट लागले. हा प्रकार निंदनीय आहे.
– महेश सावंत, उपमहापौर
Leave a Reply