
कोल्हापूर: तोकड्या पोषाखात म्हणजे बरमुडा, स्कर्ट, शॉर्टस अश्या प्रकारचे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना अंबाबाईचे दर्शन घेता येणार नाही.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्वपूर्ण निर्णय घेतला.
महिला आणि पुरुष भाविकांनी पूर्ण पोषाखात येण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आले. तसेच लहान मुलांच्या साठी कोणतेही बंधन नाही असे देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.देवीच्या दर्शनाचे आणि मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. देवस्थान समिती च्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व मंदिरात हा नियम लागू करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना मंदिर परिसरात आणि बाहेर बोर्डवर लावण्यात येणार आहे. भविष्यात मोबाईल बंदी ही करण्यात येणार आहे.हा नियम कायमस्वरूपी असल्याचे संगीता खाडे यांनी सांगितले.
Leave a Reply