
कोल्हापूर: साई-निर्मल क्रिएशन या बॅनर ची निर्मिती असलेला ‘सोपस्कार’ हा चित्रपट येत्या 12 ऑक्टोबर ला महाराष्ट्र, गोवा आणि बेळगांव जिल्ह्यात प्रदर्शित होतोय. महाराष्ट्रातील मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींचे शिक्षण, करिअर व त्यांच्या लग्नाप्रति घेतले जाणारे चुकीचे निर्णय या समाजातील वास्तवावर भाष्य करणारा चित्रपट आहे.कोल्हापूर च्या मातीत तयार झालेला हा सामाजिक चित्रपट असून कोल्हापूर च्या स्त्रीने बनविलेले हा एक स्त्री प्रधान चित्रपट आहे.सामाजिक आशय असणारा भावस्पर्शी चित्रपट आहे.कथा, पटकथा,संवाद, दिग्दर्शन अश्या सर्व धुरा सांभाळताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले तरी या कथानकास न्याय दिला आहे असे कविता विक्रमसिंह पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमने आज पत्रकारांशी मुक्त संवाद साधला.
कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेल्या आणि मूळ संस्कृती जपवून ठेवणाऱ्या या चित्रपटाने कोल्हापूरच्या कलाकारांना खऱ्या अर्थाने न्याय दिला म्हणता येईल.
या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण कोल्हापुरात झाले. गड मुडशिंगी या गावचे सर्व चित्रीकरण आहे.उत्तम लोकेशन्स, चित्रीकरण, बहारदार संगीत, तांत्रिक दृष्ट्या सफाईदार असा हा चित्रपट म्हणता येईल.
विशेष म्हणजे कोल्हापूच्या सर्व कलाकारांना खूप चांगला एक्सपोसर मिळाला आहे. कारण हा चित्रपट कोल्हापूरच्या मातीतून तयार होऊन महाराष्ट्र, बेळगाव, गोवा येथे जात आहे.
आज मराठी चित्रपटा करिता PVR /INOX / Multiplex मिळवताना निर्मात्यांना अक्षरशः तळवे झिजवावे लागतात पण हा एका स्त्री चा लढा यशस्वी झाला असे म्हणता येईल.
मध्यम व सामान्य घरातील स्त्री जेव्हा आपला उंबरा ओलांडून चित्रपट निर्मितीचे साहस दाखवते, सर्व अडी-अडचणींतून मार्ग काढून चित्रपट प्रदर्शित करण्याचे शिव-धनुष्य पेलते तेव्हा कोल्हापुरी माणसांची मान उंचावते.
‘सोपस्कार’ चित्रपटाची कथा स्त्री प्रधान असून संपूर्ण कथानकाला कौटुंबिक संस्काराची जोड आहे.
कोल्हापूर च्या मातीतील हा चित्रपट तितकाच सांस्कृतिक, मनोरंजनात्मक व आपलासा वाटतो. पवित्रधारा ही या चित्रपटातील मुख्य व्यक्तरेखा आहे. जिच्या भोवती हा चित्रपट फिरतो.गरुड भरारी घेणाऱ्या आजच्या स्त्रीला काही सामाजिक मर्यादा असतातच.लडकी म्हणजे ‘पराया धन’ असे मानणाऱ्या पालकांना आपल्या मुलीचे लग्न उरकून टाकले की फार मोठी जबाबदारी पार पडल्याचे समाधान वाटते.पण पुढे त्या मुलीचे काय होईल? तिचे स्वातंत्र्य कसे असेल? तिच्या वाट्याला नक्की कसे जगणे येईल?? याचा विचार कोणी करताना दिसत नाही.
या चित्रपटातील पवित्रधारा चे तिरंदाजी चे स्वप्न साकार होईल का? लग्नानंतर तिच्या इच्छा पूर्ण होतील का? तिला शिक्षण घेता येईल का?? एकंदरीत परिस्थिती प्रमाणे पवित्रधारा काय निर्णय घेणार?या आणि अश्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी ‘सोपस्कार’ हा चित्रपट नक्की बघितला पाहिजे.आदर्श शिंदे यांनी या चित्रपटातील दमदार गाणी गायली आहेत.संगीत तेजस चव्हाण, नृत्य संग्राम भालकर, संकलन बी.महेंतेश्वर, छायांकन बाबा लाड यांचे असून पवित्रधारा, धनंजय पाटील, धनंजय पोलादे, प्रिया पाटील, सुमेधा दातार, अमोल चव्हाण, मंजित माने,अभिषेक पाटील, प्रफुल्ल पाटील, सोनाली पाटील यांच्या भूमिका आहेत.धनंजय पोलादे,धनंजय पाटील या कोल्हापूरच्या कलाकारांनी या चित्रपटात महत्वाची भूमिका केली आहे.सर्व नवीन चेहऱ्यांना या चित्रपटात संधी देण्यात आली आहे. सामाजिक विषय,योग्य हाताळणी, संपूर्ण कुटूंबाने पहावा असा हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल असा विश्वास संपूर्ण टीमने यावेळी व्यक्त केला.
Leave a Reply