देवीचा उत्सव की संकटांचं तांडव?

 

स्टार प्रवाहवरील छोटी मालकीण या मालिकेत आलंय धक्कादायक वळण. धामणगावात दरवर्षीप्रमाणे देवीचा उत्सव साजरा केला जातोय. अण्णासाहेब गायब झाल्यानंतर वारसदार म्हणून देवीच्या पुजेचा मान आपल्याला मिळावा यावरुन विराट आणि गावकऱ्यांमध्ये रणधुमाळी सुरु आहे. बऱ्याच वादावादीनंतर एकमताने गावकरी विराटऐवजी श्रीधरला देवीच्या पुजेचा मान देतात. यानिमित्ताने नव्या बदलांची नांदी धामणगावात सुरु झालीय. अण्णासाहेबांचा एकमेव वारसदार असूनही विराटला पुजेचा मान मिळाला नाही ही गोष्ट त्याच्या मनात खदखदतेय. त्यामुळे सुडाच्या आगीने पेटलेल्या विराटने देवीच्या पुजेत विघ्न आणण्याचा प्लॅन आखलाय. विराटचा हा प्लॅन यशस्वी होणार का? देवीच्या उत्सवाला संकाटाचं गालबोट लागणार का? या जीवघेण्या प्रसंगातून रेवा-श्रीधर कसे वाचणार? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ‘छोटी मालकीण’च्या महाएपिसोडमधून मिळणार आहेत.

तेव्हा पाहायला विसरु नका ‘छोटी मालकीण’चा महाएपिसोड रविवार १४ ऑक्टोबरला दुपारी १.०० आणि रात्री ८.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!