
कोल्हापूर: विवेकानंद कॉलेज मधील कम्युनिटी कॉलेज विभागाकडून यावर्षी ऍडव्हान्स डिप्लोमा इन फोटोग्राफी हा दोन वर्षांचा डिप्लोमा सुरू केला आहे. यानिमित्त फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. विवेकानंद सह सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ही एक दिवसीय फोटोग्राफी कार्यशाळा संपन्न झाली. फोटोग्राफी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट सुभाष फोटोग्राफीकडून निकॉन कंपनीतील तज्ञ नीरज भाकरे, नवीन कृष्णन यांनी याबद्दल मार्गदर्शन केले.
आज आपण आपल्या मोबाईलमध्ये सहज फोटो काढतो सेल्फी काढतो. पण याला फोटोग्राफी म्हणता येत नाही. ही एक कला आहे. फोटोग्राफी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीचा दृष्टीकोन वेगवेगळा असू शकतो. पण ज्या घटनेचा, गोष्टींचा किंवा व्यक्तींचा फोटो काढायचा आहे त्याचे अंतर, उंची, परिस्थिती यावर फोटोग्राफी अवलंबून असते. याचे भान ठेवणारे उत्कृष्ट फोटोग्राफर बनू शकतात. आपले डोळे जे काम करतात तेच काम कॅमेरा करतो.कॅमेरा कसा हाताळावा शटल, लेन्स, आय एस ओ, एक्सप्लोरर याचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविण्यात आले. यावेळी स्वागत प्रा.सतिश गायकवाड यांनी केले. अध्यक्षस्थानी प्राचार्य अभयकुमार साळुंखे होते. यावेळी फोटोग्राफी विभाग प्रमुख रविराज सुतार, राहुल इंगवले आनंद सावंत, श्रद्धा शिंदे सुभाष फोटोग्राफीचे शंभू आऊळकर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश उपळावीकर यांनी केले.
Leave a Reply