सह्याद्रि हॉस्पिटल्सतर्फे कोल्हापूरात वंध्यत्व मोफत तपासणी व शिबिर

 

कोल्हापूर : सह्याद्रि हॉस्पिटल्स कराड तर्फे कोेल्हापूर येथे वंध्यत्वाबाबत मोफत तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रविवार,21 ऑक्टोबर 2018 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान हॉटेल पर्ल (कॉन्फरन्स हॉल,ग्राऊंड फ्लोअर,हॉटेल पर्ल,सीबीएस एसटी स्टँडजवळ,कोल्हापूर) येथे होणार आहे. पुण्यातील सुप्रसिध्द वंध्यत्व चिकित्सा तज्ञ डॉ.सुप्रिया पुराणिक तसेच डॉ.आरती रापोल हे मार्गदर्शन करतील. नोंदणीसाठी विश्‍वजीत डुबल -9673338012 या क्रमांकावर संपर्क साधावा.ज्या स्त्रियांमध्ये दोन्ही गर्भनलिका बंद आहेत,ज्यांच्या गर्भाशयाच्या पिशवीला गाठ आहे किंवा पडदा आहे,ज्या स्त्रियांची मासिक पाळी अनियमित आहे,ज्या पुरूषांमध्ये शुक्राणू संख्या कमी आहे व ज्या पुरूषांच्या शुक्राणूमध्ये स्त्रीबीज भेदण्याची क्षमता कमी आहे,ज्यांचा आयव्हीएफचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला आहे आणि ज्यांचे उशिरा लग्न झाले आहे अथवा वय जास्त आहे,अशांसाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार आहे.उपचारांची गरज असल्यास पुण्याला जाण्याची गरज नसून सर्व उपचार कराड येथील सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथेच केले जातील. जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक वंध्यत्व निवारण तंत्रज्ञानाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांना व्हावा या दृष्टीने सह्याद्री हॉस्पिटल्स ने वर्षातून 5-6 मोफत तपासणी शिबिर कोल्हापूर ला आयोजित करण्याचे ठरविले आहे. डॉ सुप्रिया पुराणिक दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसर्‍या रविवारी तर डॉ आरती रापोल ह्या दर बुधवार व शुक्रवारी सह्याद्री हॉस्पिटल कराड येथे उपचारांसाठी उपलब्ध आहेत. पुण्याबरोबरच, तितक्याच दर्जाची सर्व सोयींनीयुक्त आयव्हीएफ लॅब कराड सह्याद्रीला उपलब्ध असून कोल्हापूरच्या रुग्णांना 1 तासाच्या अंतरावरील कराडला त्याचा लाभ घेता येतील.याप्रसंगी बोलताना डॉ.सुप्रिया पुराणिक म्हणाल्या की, भारताची प्रगती जरी वेगाने होत असली तरी दुसरीकडे आरोग्यविषयक समस्या तितक्याच झपाट्याने वाढत आहेत. यामधील एक प्रमुख समस्या म्हणजे स्त्रिया व पुरूषांमधील वाढणारे वंध्यत्व.याला मानसिक आणि शारीरिक तणाव, अनुवांशिकता आणि पर्यावरणीय घटक कारणीभूत असू शकतात. पूर्वीच्या काळी आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध नव्हत्या परंतु आता आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे हे चित्र बदलू लागले आहे.वंध्यत्वाबाबतच्या समस्या,गुंतागुंत यांवर नव्या तंत्रज्ञानामुळे मात करणे शक्य झाले आहे.याप्रसंगी बोलताना डॉ.आरती रापोल म्हणाल्या की,वंध्यत्वाचे प्रमाण हे स्त्री व पुरूषांमध्ये सारखेच याला निमशहरी व ग्रामीण भागही अपवाद नाही.त्यामुळे योग्य वेळी निदान व उपचार हाच यांवर मात करण्याचा पर्याय आहे.सह्याद्रिमध्ये जागतिक पातळीची आरोग्यसेवा देत याआधीही या समस्येने ग्रस्त असलेल्या रूग्णांवर यशस्वीरित्या उपचार करून चांगले परिणाम दर्शविले आहेत.डॉ.सुप्रिया पुराणिक या आघाडीच्या वंध्यत्व चिकित्सा तज्ञ असून ग्रामीण भागात देखील त्यांनी मोठ्या प्रमाणावर याबाबत कार्य केले आहे.सातारा जिल्ह्यात त्यांनी यशस्वीपणे टेस्टट्युब बेबीचे तंत्र वापरले आहे.सतत नवीन तंत्रज्ञानाचे अंगीकरण करून अनेक दांपत्यांच्या चेहर्‍यावर हसू फुलविले आहे.कराडमध्ये सह्याद्रिच्या वैद्यकीय संचालक म्हणून नावलौकिक कमावल्यावर आता त्या सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल,नगर रोड येथे कार्यरत आहेत.आपल्याकडे असलेल्या वैद्यकीय कौशल्यामुळे त्यांनी अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया यशस्वीरित्या करत फक्त पुणे किंवा देशातच नव्हे तर जगभरात नावलौकिक कमावले आहे.नुकतेच बीबीसीने देखील त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!