
पूर्णतः नव्या अॅपमध्ये या श्रेणीतील पहिल्या सेवा समाविष्ट; मर्चंट्स / रिटेलर्स यांना इन्व्हॉइस तयार करण्यासाठी बारकोड स्कॅन करता येतील, इन-बिल्ट डॅशबोर्डद्वारे इन्व्हेंट्रीचा व क्रेडिटवर विक्री केल्याचा मागोवा घेता येईल. त्यांना पूर्णतः डिजिटल व पेपरलेस पद्धतीने तातडीने कार्ड-स्वाइप मशीन मागवता येऊ शकते – या क्षेत्रातील आणखी एक पहिलेवहिले वैशिष्ट्य महाराष्ट्रात सध्याअंदाजे 41,000 मर्चंट्सचीईझीपेवर नोंदणी
कोल्हापूर : आयसीआयसीआय बँक या एकत्रित मालमत्तेच्या बाबतीत भारतातील सर्वात मोठ्या खासगी बँकेने ‘ईझीपे’ या देशातील पहिल्या डिजिटल पॉइंट-ऑफ-सेल (पीओअस)अॅप्लिकेशनमध्ये या क्षेत्रातील पहिलीवहिली अशी अनेक वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. नोटाबंदीच्या काळात मर्चंट/रिटेलर्स व प्रोफेशनल्स यांना युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय), कोणत्याही बँकेचे क्रेडिट/डेबिट कार्ड व इंटरनेट बँकिंग, आदार पे, भारत क्यूआर कोड व‘पॉकेट्सबायआयसीआयसीआयबँक’ डिजिटल वॉलेट अशा विविध डिजिटल माध्यमांद्वारे पेमंट स्वीकारणे शक्य होण्याच्या उद्देशाने बँकेने ही सुविधा सुरू केली. तेव्हापासून, ईझीपेने 1.93लाखाहून अधिक ग्राहक मिळवले आहेत आणि बँकेचे फिजिकल व डिजिटल पीओएसचे देशव्यापी जाळे सक्षम करत 7 लाखांहून अधिक संख्येपर्यंत नेले आहे.हे अॅप्लिकेशन आता निरनिराळ्या नव्या सेवा देत असून, या सेवा या क्षेत्रामध्ये अपूर्व आहेत. मर्चंट/रिटेलर्स/प्रोफेशनल्स यांना बँकेच्या शाखेत जाण्याची गरज न भासता, पूर्णतः डिजिटल व पेपरलेस पद्धतीने कार्ड-स्वाइप मशीनसाठी तताडीने अर्ज करण्याची सोय यामध्ये समाविष्ट आहे. इन्व्हॉइस तयार करण्यासाठी बारकोड स्कॅन करता येतील; इन-बिल्ट डॅशबोर्डद्वारे इन्व्हेंट्रीचा मागोवा घेता येईल व क्रेडिटवर विक्री केलेल्या ग्राहकांचा मागोवा अॅपमधील इन-बिल्ट डॅशबोर्डद्वारेयेईल. तसेच, मध्यम ते मोठ्या स्वरूपाचे कार्य असणाऱ्या रिटेलरच्या सोयीच्या दृष्टीने, त्यांच्या कर्मचाऱ्यांनाही हे अॅप्लिकेशन वापरून, दुकानातील विविध काउंटरवर मोबाइल फोनद्वारे पेमेंट घेता येऊ शकते. या सेवेचा वापर अन्य शहरांतील शाखांमध्ये, तसेच होम डिलेव्हरी देत असताना वाटेतही करता येऊ शकतो.नव्या वैशिष्ट्यांविषयी बोलताना,आयसीआयसीआय बँकेचे कार्यकारी संचालक अनुप बागची म्हणाले, “आयसीआयसीआय बँकेने डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या हेतूने डिजिटल बाबतीत नावीन्य आणण्यासाठी नेहमीच प्रवर्तक भूमिका बजावली आहे. या उद्दिष्टाला अनुसरून, नोटाबंदीच्या कालावधीदरम्यान आम्ही एक मोबाइल अॅप्लिकेशनम्हणून ‘ईझीपे’ डिजिटल पॉइंट-ऑफ-सेल सुविधा सुरू केली. ही संकल्पना आधुनिक व नवी होती. एकाच अॅप्लिकेशनवर विविध माध्यमांतून डिजिटल पेमेंट स्वीकारण्याची सुविधा देशभरातील लाखो मर्चंट, रिटेलर्स व प्रोफेशनल्स यांना देणे, हा त्यामागील हेतू होता. ईझीपेला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, किराणा दुकाने, रेस्तराँ, ट्रॅव्हल व टूर ऑपरेटर्स, केमिस्ट व प्रोफेशनल यांच्याकडून या सुविधेचा वापर केला जात आहे. ही सेवा अत्यंत उपयुक्त असल्याने, तिचे जाळे 1.93 लाखांपर्यंत वाढले आहे आणि त्यामुळे बँकेचे फिजिकल व डिजिटल पीओएसचे देशव्यापी जाळे 7 लाखांहून अधिक संख्येपर्यंत पोहोचले आहे. सखोल संशोधनातून पूर्णतः नवे ईझीपे साकारले आहे आणि ते निरनिराळ्या प्रकारच्या सेवा देत आहे. त्यातील अनेक सेवा या क्षेत्रातील पहिल्यावहिल्या ठरल्या आहेत. जसे, कार्ड-स्वाइप मशीनसाठी तातडीने व पेपरलेस अर्ज आणि तातडीने इन्व्हॉइस करण्यासाठी बारकोड स्कॅनिंग. माझ्या मते, या नव्या वैशिष्ट्यांमुळे या सुविधेची उपयुक्तता आणखी व्यापक होणार आहे आणि त्यामुळे रिटेलरना अतिशय सर्वंकष डिजिटल पेमेंट कलेक्शन साधन मिळून त्यांची सोय व लवचिकता वाढणार आहे. नजिकच्या काळात, ईझीपे बँकेच्या फिजिकल पीओएस नेटवर्कला मागे टाकेल आणि अर्थव्यवस्थेमध्ये लेस-कॅश व्यवस्था निर्माण करण्यासाठी योगदान देईल, असे मला दिसते आहे.”आयसीआयसीआय बँकेत करंट अकाउंट असणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवरून अपग्रेडेड ‘ईझीपे’ अॅप डाउनलोड करता येईल. त्यांना कार्ड-स्वाइप मशीनसाठी पूर्णतः डिजिटल व पेपरलेस पद्धतीने तातडीने अर्जही करता येईल. व्यवहारांचे प्रमाण व स्वरूप यानुसार, मर्चंटना तीन प्रकारची स्वाइप-कार्ड मशीन घेता येतील.ईझीपेमध्ये सुरक्षेची या श्रेणीतील सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. एका मोबाइल क्रमांकासाठी केवळ एक नोंदणी करता येते आणि प्रत्येक लॉगिनच्या वेळी एमपिनद्वारे ऑथेंटिकेशन बंधनकारक असते.
सध्या महाराष्ट्रातील अंदाजे 41,000 मर्चंटनीईझीपेवर नोंदणी केली आहे. या अॅप्लिकेशनचा प्रामुख्याने वापर रेस्तराँ, ट्रॅव्हल व टूर ऑपरेटर, केमिस्ट व प्रोफेशनल असे मर्चंट करतात.ईझीपेची या क्षेत्रातील पहिलीवहिली नवी वैशिष्ट्ये पुढील आहेत:स्कॅन–एन–बिल: मर्चंटना ईझीपे अॅपवापरून हजारो एफएमसीजी मर्चंडाइजचे बारकोड स्कॅन करता येतील आणि डिजिटल पद्धतीने इन्व्हॉइस तयार करता येईल.कॅश व क्रेडिटवरील विक्रीसाठी उपयुक्त: हेअॅप मर्चंटना पेमेंटना ‘पेड बाय कॅश’ किंवा‘सोल्ड ऑन क्रेडिट’ असे टॅग देण्याची सोय देते. ‘सोल्ड ऑन क्रेडिट’ असा टॅग असणारे व्यवहार सध्याच्या कलेक्शनच्या पद्धतींपैकी कोणत्याही पद्धतीद्वारे पेमेंट स्वीकारून पूर्ण करता येऊ शकतात.एकात्मिक सेल्स डॅशबोर्ड: अॅपमध्ये इन-बिल्ट सेल्स डॅशबोर्ड असून, त्यावर विकलेल्या उत्पादनांचा सर्वंकष सारांश दाखवला जातो. त्यामुळे मर्चंटना खरेदीच्या पद्धतींचा आढावा घेण्यास मदत होते. मर्चंटना रिकन्सिलिएशन करणे सोपे होण्यासाठी, सर्व माध्यमांतून घेतलेल्या पेमेंट्सचे एकत्रित एमआयएस याद्वारे उपलब्ध केले जाते.सब मर्चंट लिमिट: ‘सब मर्चंट क्रिएशन’ या विशेष सुविधेमुळे आता मध्यम ते मोठ्या रिटेलरना आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्मार्टफोनद्वारे पेमेंट स्वीकारण्याची अनुमती देणे शक्य होणार आहे. सुपर मार्केट किंवा मोठ्या फार्मसीज अशा अनेक बिलिंग काउंटर असणाऱ्या, अन्य शहरांत शाखा असणाऱ्या व घरपोच सेवा देणाऱ्या रिटेलरसाठी प्रामुख्याने ही सुविधा उपयुक्त ठरेल.क्वेरी व सपोर्ट रिक्वेस्ट: मर्चंटना आताअॅपद्वारे थेट सपोर्ट रिक्वेस्ट पाठवून त्यांच्या शंकांची उत्तरे मिळवता येतील. मर्चंटसाठी B2B पेमेंट्स: मर्चंटनाअॅपमधील या ‘माय इन्व्हॉइसेस’ पर्यायाद्वारेB2B पेमेंट करता येतील. ही सुविधा केवळ निवडक उत्पादकांसाठी उपलब्ध आहे.कार्ड स्वाइप मशीनद्वारे पेमेंट स्वीकारणे:विविध प्रकारची कार्ड स्वाइप मशीन वापरून ग्राहकांना डेबिट व क्रेडिट कार्ड स्वाइप करण्याची सुविधा देऊन, मर्चंटना आता पेमेंट स्वीकारता येतील. सर्व तीनही उपकरणे व्हिसा, मास्टरकार्ड व रुपे यांची मॅग्नेटिक स्ट्रिप (स्वाइप) आणि चिप-बेस्ड (इन्सर्ट/डिप) कार्डे स्वीकारतात.
Leave a Reply