येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडविणार:ऍड प्रकाश आंबेडकर

 

कोल्हापूर: वंचित समाज 40 टक्के आहे. मात्र हा 40 टक्के समाज एकत्र आला तर येथील प्रस्थापितांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. लोकसभा उमेदवारीची , पहिल्या टप्प्यातील नावाची यादी जाहीर केली असून यामध्ये कदापि आता तडजोड केली जाणार नाही. असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते एड.प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षाच्या वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शिवाजी स्टेडियम इथं आज संपन्न झाली. या सभेत आघाडीच्या सर्वच नेत्यांनी भाजप सरकार वर टिकेची तोफ डागत, येणाऱ्या निवडणुकीत परिवर्तन घडविण्याच आवाहन केलं.  या सभेत एड.  प्रकाश आंबेडकर यांनी , आपल्या भाषणाच्या प्रारंभीच लोकसभेच्या उमेदवारांची घोषणा केली. 2024 मध्ये आम्ही संविधान बदलल्याशिवाय राहणार नाही. असं वक्तव्य भाजपवाले करत आहेत. त्यामुळं आम्ही एका विचारानं काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांनी आम्हाला झुलवत ठेवलं असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. उमेदवारांची जाहीर केलेल्या यादी बाबत आता माघार घेणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. उरलेल्या मतदार संघात विचारविनिमय आणि चर्चा करण्यास आपण तयार आसल्याचंही  त्यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसकड आम्ही जागा मागितलेल्या नाहीत. आम्हला 12 जागा द्या,  त्या  कुठल्या द्यायच्या तुम्हीच ठरवा अशी चर्चा झाली होती.  मात्र त्यांनी औवेशीना विरोध केला. मात्र आम्ही आता दूध खुळे राहिलेलो नाही काँग्रेसवल्याची चलाखी  आम्ही ओळखून आहे.भाजपवाल्याचं धोरण खाजगी करणाचे आहे. म्हणूनच राष्ट्रीय कृत बँका मोडकळीस आणल्या जात आहेत, अशी टिकाही त्यांनी केली. नोकऱ्या कमी झाल्या, बेरोजगारी वाढली या सरकारकड  कुठलंही धोरण नाही अशी घणाघाती टिकाही त्यांनी केली. आम्ही सत्तेवर आलो तर, विना तारण कर्ज देणाऱ्या बँका उभा करू असं अश्वासनही त्यांनी दिल.वंचितांना सत्तेवर यायचं असेल तर, आपण सर्व वंचितांनी एकत्र आलं पाहिजे. असं आवाहन त्यांनी केलं.जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवुया वंचितांनी अशक्य गोष्ट आपल्या शब्दकोशात नसल्याच मानलं पाहिजे. वंचित समाज 40 टक्के आहे. मात्र हा 40 टक्के समाज एकत्र आला तर येथील प्रस्थापितांना घरी बसवल्याशिवाय   राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेसचे नेते भाजप समोर म्याव आहेत, ते कधी वाघ होऊ शकत नाहीत कारण त्यांची मुंबईची बिल्डिंग बाहेर पडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही डागळलेले आहात. राफेल विमानाचे स्पेअर पार्ट न मिळाल्यास ते कचऱ्यात टाकून देण्याच्या लायकीचे होणार आहेत. 
हे सरकार लुटारूनचे सरकार असल्याची घणाघाती टिकाही त्यांनी केली. नोटबंदी मध्ये जुन्या नोटा कशा सापडल्या हे स्पष्ट करा असं आव्हानही त्यांनी केलं
या सरकारला घालवल्याशिवाय आपण अबाधित राहू शकणार नाही.  प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी, सभेला विरोध करणाऱ्या रविकिरण इंगवले यांचा खरपूस समाचार घेत, फडतूस इंगवले असा शब्दात त्यांचा समाचार घेतला. शिव ओलडू देणार नाही म्हणणाऱ्या इंगवलेना शिव आहे काय असा संतप्त सवाल करत 25 तारखेला खासदार औवेशी यांची मुंबईत सभा होणार आहे हिम्मत असेल तर त्यांनी तेथ येऊन विरोध करावा असं आव्हान ही त्यांनी दिल.  शिवसेनेनं उगाच कोल्हे कुई करू नये राजकारणाची मखलाशी बंद झाली पाहिजे.  उपराकार लक्ष्मण माने यांनी, यावेळी विधानभवनावर वंचतीचा झेंडा उभा राहील. असा विश्वास व्यक्त केला.  बहुजनांची कोंडी निर्माण होईल अशा प्रकारे शिक्षण व्यवस्था बदलली जात आहे. आमच्या आघाडीच सरकार आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेऊ. असं आश्वासनही त्यांनी दिल. मन की बात करणाऱ्यानी आमच्या मनातील बात ऐकून घ्यावी, असा टोला लागावत,  चहा विकणाऱ्या पंतप्रधान  मोदी कडे १५ लाखांचा सूट कुठून आला असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गायीचं नाव घेऊन, देशात जातीयवाद जोपासला जात असल्याची टिकाही त्यांनी केली.  धनगर समाजाचे नेते एड.  विजयराव मोरे यांनी, बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारांना मतदान करा, परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नाभिक समाजाचे नेते गोविंद दळवी यांनी, यापूर्वी नाभिक समाजाला नेता नव्हता, जे होते ते दलाल होते. अशी घणाघाती टिका केली. नाभिक समाजानं आपला स्वतःचा  चेहरा आरशात बघावा, त्यामध्ये शाहू,  फुले,  आंबेडकर दिसल्याशिवाय राहणार नाही. आम्ही सेवा भावी समाज म्हणून जगत आहे मात्र आमची कोणी दखल घेतली नसल्याचही ते म्हणाले. जयसिंग शेंडगे यांनी, वर्षानुवर्षे घराणे वारसा चालत आलाय आता कुठे तरी याला लगाम देऊया. आणि वंचित बहुजन आघाडी विजयी करण्याचं आवाहन त्यांनी केलं. पारधी समाजाचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण यांनी, 
खासदार असदुद्दीन ओवेसी आले नाहीत यामुळं अनेकांना उकळ्या फुटत असतील तर जरूर फुटू द्या. तुमच्या दादागिरीला वंचित बहुजन आघाडी भीक घालणार नसून फुसक्या धमक्यांना खासदार ओवेशी घाबरलेले नाहीत. तुमचा बाप आला तरी आम्हीं बोलण्याच बंद होणार नाही. लोकसभेची निवडणूक ज्यावेळी सुरू होईल. त्यावेळी खासदार औवेशी  जरूर कोल्हापूरात येतील असही त्यांनी जाहीर केलं.  आमची लढाई मनुस्मृती , ब्राम्हण वाद्या विरोधात  सुरू असून. ४८ उमेदवारांची यादी प्रकाश आंबेडकर यांच्या खिशात असल्याचंही ते म्हणाले. एमआयएमचे नेते प्राध्यापक शाहिद शेख यांनी, मुस्लिम समाज तुमच्या सोबतच राहील. आमचा स्वाभिमानाला डिवचू नका. आम्ही कार्याचे आणि कर्तुत्वाचे वारस आसल्याचं ते म्हणाले. विकृत इतिहास मांडला जात असून त्यामुळे जातीयवाद पोसला जात असल्याची टिकाही त्यांनी केली. भटक्या विमुक्त समाजाचे नेते बबनराव कावडे यांनी, दादा विधाते आयोग नेमला मात्र आम्हाला अद्याप न्याय मिळाला नाही. ऍड अण्णारावजी पाटील यांनी,  सभा होऊ देणार नाही म्हणणारे भुरटे हिकडे फिरकले नाहीत अशी टीका केली. आम्ही शांत आहोत,  आम्ही लढाई करत नाही, म्हणून भुरटे आता मान वर काढत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 
वंचित बहुजन आघाडीचे नेते नामदेव कडगणे आदींनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी प्राध्यापक सुकुमार कांबळे, पार्थ पोळके, नवनाथ पडळकर, सचिन माळी, लक्ष्मण माने, राजा शिरगुप्पे, विक्रम पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!