News

सराफ व्यापारी संघाच्या इमारतीचे नूतनीकरण

March 5, 2021 0

कोल्हापूर: येथील कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या घाटी दरवाजा येथील इमारतीचे नूतनीकरण उपाध्यक्ष जितेंद्र राठोड व सभासद मुरलीधर गणपत पोतदार यांच्या हस्ते करण्यात आले.सराफ व्यापारी संघाची करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराशेजारी घाटी दरवाजा येथे इमारत आहे. येथे […]

News

कुंभार समाजावर अन्याय होवू देणार नाही; नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

March 3, 2021 0

मुंबई : कुंभार समाजाचा संपूर्ण व्यवसाय, माती आणि प्लास्टर ऑफ पॅरिसवर अवलंबून आहे. परंतु, प्लास्टर ऑफ पॅरिसवर घालण्यात आलेल्या बंदीमुळे कुंभार समाजाचे अतोनात नुकसान होत आहे. कुंभार समाजाला गणेश मूर्ती करण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसशिवाय पर्याय […]

News

आठ मार्च ते आठ जून समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान:ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

March 3, 2021 0

कागल:येत्या आठ मार्चच्या महिला दिनापासून आठ जूनपर्यंत सबंध महाराष्ट्रभर तीन महिने समृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबवणार, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. महिला अबला नाहीत, त्या सबला आहेत. यापुढे त्यांना अजून सक्षम करण्याची […]

News

सेवा निलयम संस्थेच्या वतीने ‘रोटी डे’ साजरा

March 3, 2021 0

कोल्हापूर: दरवर्षीप्रमाणे दि. १ मार्च रोजी सेवा निलयम संस्थेमार्फत ‘रोटी डे’ साजरा करण्यात आला.रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरातील गरजू लोकांना त्याप्रमाणे काही प्रवाश्यांना जेवण वाटप करण्यात आले. हा उपक्रम मागील ४ वर्षे संस्था करत […]

News

हॉटेल मनोरा’ ला नाहक बदनाम केलंय; हॉटेल मालक निवास बाचुळकर

March 1, 2021 0

कोल्हापूर:कोल्हापुरातील एका नामांकित हॉटेलमध्ये जेवणात पाल सापडल्याचा बहाणा करून कांगावा करणाऱ्या तरुणांचे कारस्थान हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्याने उघडकीस आले आहे. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर जेवणामध्ये पाल सापडल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. याबद्दल हॉटेल प्रशासनाने […]

News

कोल्हापूरात संकट काळात गोकुळचे योगदान मोलाचे:बाजीराव खाडे

March 1, 2021 0

कोल्‍हापूर :जागतिक पातळीवर ठप्प झालेली अर्थव्यवस्था कोरोनाचे संकट, अनेक उद्योगधंदे बंद पडले, असताना सुद्धा गोकुळची संकलन, प्रक्रिया व वितरण व्‍यवस्‍था सुयोग्य पद्धतीने चालू ठेवून आपण वेगळा ठसा उमटवला व जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना आधार दिला असे उद्गार […]

News

शिवसेनेच्या दणक्याने ब्रम्हपुरी येथील बेकायदेशीर काम बंद

March 1, 2021 0

कोल्हापूर: ब्रम्हपुरी येथील हॉली इव्हेंजलिस्ट चर्च च्या मालकीच्या पॅरिश हॉल येथे ट्रस्टशी काडीमात्र संबध नसणाऱ्या व्यक्तीकडून बेकायदेशीर बांधकाम सुरु होते. याबाबत संबधित ट्रस्टच्या स्थानिक व्यवस्थापनाने आणि स्थानिक ख्रिश्चन समाज बांधवांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागवून सदर […]

Information

‘ झोंबिवलीचा’ टिझर लाँच !पहिलाच झोंबिंवर आधारित हॉरर- कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला.

February 25, 2021 0

फास्टर फेणे, क्लासमेट्स,  माऊली ह्यासारख्या अप्रतिम चित्रपटांचे  दिग्दर्शक आदित्य सरपोतदार लवकरच त्यांचा बहूचर्चित ‘ झोंबिवली ‘ हा  सिनेमा प्रेक्षकांसमोर सादर करणार आहेत. चित्रपटाच्या पोस्टर लाँचनंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली  होती. नुकताच ह्या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे . अमेय वाघ, ललित प्रभाकर आणि वैदेही परशुरामी ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट ३० एप्रिल पासून प्रेक्षकांना चित्रपटगृहात पाहता येईल. २०२० मध्ये सिनेसृष्टीतल्या सर्वच कामांना ब्रेक लागला होता, पण झोंबिवली हा पहिला मराठी चित्रपट आहे ज्याचे चित्रीकरण अनलॉक फेजमध्ये करण्यात आले होते. यौडली फिल्म्सची निर्मिती असलेल्या झोंबिवलीचे चित्रीकरण मुंबईसह लातूरमध्ये करण्यात आले आहे. चित्रीकरण दरम्यान सर्व कलाकार व टीमने सरकारने  आखून दिलेल्या नियमांचे पालन करूनच चित्रीकरण केले. त्याचबरोबर झोंबिवली हा असा पहिला मराठी चित्रपट असेल ज्याची चित्रपटगृहात रिलीज होण्याची घोषणा झाली आहे. मुंबईच्या एका लोकप्रिय आणि गजबजलेल्या उपनगराचा ताबा घेणाऱ्या झोंबीवर हा चित्रपट आधारित आहे. टिझरमध्ये प्रेक्षकांना हॉरर आणि कॉमेडीचे मिश्रण बघायला मिळेल. अमेय, ललित आणि वैदेही हे तिन्ही कलाकार प्रेक्षकांच्या मनात कुतूहल आणि हास्याचे वातावरण निर्माण करतात. ह्या सिनेमाविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य सरपोतदार म्हणतात,मराठी मध्ये हॉरर- कॉमेडी सिनेमे तसे खूप कमी बनवले जातात आणि झोंबीवर आधारित हा पहिलाच सिनेमा असेल. चित्रपटाची गोष्टसुद्धा खूप हटके आहे. गेल्या वर्षी आम्ही चित्रपटाचे पोस्टर लाँच केले,  तेव्हा प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता ह्या टीझरमुळे  चाहत्यांना झोंबिवलीच्या जगाची झलक पाहायला मिळेल.आम्ही खूप आव्हानात्मक परिस्थितीत ह्या सिनेमाचे शूटिंग केले. लवकरच हा सिनेमा चित्रपटगृहात रिलीज होणार आहे, त्यामुळे अभिमान आणि उत्साह वाटतो. लवकरच चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा रिलीझ होईल व प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडेल याची मला खात्री आहे.”असा हा भव्य चित्रपट अनेक अर्थांनी अनोखा आहे. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा आवर्जून पाहावा.

No Picture
News

प्रारुप मतदार याद्यातील घोळ मिटत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका:राहूल चिकोडे

February 25, 2021 0

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक १६/०२/२०२१ रोजी प्रभाग निहाय प्रारुप मतदार याद्या प्रशासनाने जाहीर केल्या. या यादयांवर आक्षेप घेण्यासाठी दिनांक २३/०२/२०२१ हा अंतिम दिवस होता.  प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर या प्रारूप […]

News

नाबार्डचे केडीसीसी बँकेला डिजिटल व्यवहार प्रणालीसाठी सव्वा कोटींचे अर्थसहाय्य

February 25, 2021 0

कोल्हापूर:नाबार्डकडून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जिल्ह्यातील सर्व गावे, दुर्गम वाड्या-वस्त्यावरील ग्राहकांना एटीएम सेवा देण्यासाठी तीन मोबाईल व्हॅनकरिता ४५ लाख रुपये तसेच बॅंकेच्या ग्राहकांना पुरविलेल्या रुपे डेबिट (किसान क्रेडिट कार्ड) सुविधेपोटी १२ लाख रुपये याप्रमाणे […]

1 42 43 44 45 46 52
error: Content is protected !!