शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा वाढदिवस शहर शिवसेनेच्यावतीने विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

 

कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या दि. २७ जुलै रोजी ५७ व्या वाढदिवसानिमित्त कोल्हापूर शहर शिवसेनेच्या वतीने शहरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करणेत होते. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने शिवसेना मार्गक्रमण करीत असून ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या सुत्रानेच पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक दृष्टीने साजरा करण्याचे आवाहन आमदार राजेश क्षीरसागर यांनी केले होते.
यानुसार शहरातील शिवसेना विविध विभागांच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध ठिकाणी रक्तदान शिबिर, स्नेह भोजन, फळे वाटप आदी सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. राजकारणापेक्षा समाजकारण, नागरिकांच्या समस्या यासाठी शिवसेना नेहमी अग्रेसर राहते याचा प्रत्यय सर्वसामान्य नागरिकांना वेळोवेळी आला आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या एका आदेशाने मुंबई मध्ये रक्तदानाचा विश्वविक्रम नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे रक्तदान शिबिराद्वारे जास्तीत जास्त बाटल्यांचे रक्त संकलन करण्याचा निर्धार दरवर्षी कोल्हापुरचे शिवसैनिक करतात. त्याचपद्धतीने शहरात सुमारे २५ ठिकाणी शिवसेना विभागांनी रक्तदान शिबिरांचे नेटके नियोजन केले होते. यास शहरातील शिवसैनिकांसह शहर्वासियानीही उस्फुर्त प्रतिसाद दिला.
शिवसेना पक्षप्रमुखांच्या वाढदिवसाची पर्वणी साधून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांची सुरवात श्री अंबाबाईस महाभिषेक अर्पण करून करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो यासाठी समस्त शिवसेना शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना शाखा जोतीबा रोड यांच्या मार्फत श्री अंबाबाईला महाअभिषेक अर्पण करून पक्षाप्रमुखांच्या उदंड आयुष्यासाठी साकडे घालणेत आले. यावेळी *फेरीवाले सेनेचे शहरप्रमुख धनाजी दळ्वी, राजू पाटील, शिवसेना विभागप्रमुख गजानन भुर्के, सुनील भोसले, दिनेश साळोखे, राज अर्जुनिकर, विशाल बेलवलकर, श्रीकांत मांडलिक, विश्वनाथ पावसकर, कपिल सरनाईक, युवा सेना शहरप्रमुख पियुष चव्हाण आदी शिवसैनिक उपस्थित होते.
यानंतर शिवालय शिवसेना शहर कार्यालय शनिवार पेठ येथे रक्तदान शिबिराचे उद्घाटन ऋतुराज राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते भगिनी मंच अध्यक्षा सौ. वैशाली राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी उपशहरप्रमुख अजित राडे, अनिल पाटील, उदय पोतदार, उदय पाटील, ओंकार परमणे, वाहतूक सेनेचे हर्षद पाटील, सौरभ कुलकर्णी, विजय रेळेकर आदी उपस्थित होते. यासह शिवसेना विभाग कसबा बावडा यांचे वतीने “शिवनेरी” विभागीय कार्यालय कसबा बावडा येथे आयोजित रक्तदान शिबिरात उपशहरप्रमुख सुनील जाधव, दिनकर उलपे, संजय लाड, प्रकाश कोळी, राहुल माळी, कृष्णा लोंढे, सचिन पाटील, विध्यानंद थोरवत आदी उपस्थित होते. मंगळवार पेठ विभागाच्या वतीने अंधशाळा, मिरजकर तिकटी येथे आयोजित रक्तदान शिबिरात उपशहरप्रमुख जयवंत हारुगले, रुपेश रोडे, गजानन भुर्के, किरण पाटील, भाई जाधव आदी उपस्थित होते. शिवाजी पेठ विभागाच्या वतीने उभा मारुती चौक येथील शिबिरात उपशहरप्रमुख तुकाराम साळोखे, रणजीत जाधव, प्रशांत जगदाळे, शैलेश साळोखे, बंटी साळोखे, रुपेश इंगवले आदी उपस्थित होते. शुक्रवार पेठ विभागाच्या वतीने रहाट घाटगे तरुण मंडळ, शुक्रवार पेठ येथे संजय गांधी योजना अध्यक्ष किशोर घाटगे, सन्नी अतिग्रे, अनंत पाटील, सुरेश कदम, आदी उपस्थित होते. राजारामपुरी विभागाच्या वतीने पोपटराव जगदाळे हॉल येथे उपशहरप्रमुख विशाल देवकुळे, आझम जमादार, अश्विन शेळके, मंदार तपकिरे आदी उपस्थित होते. शाहूपुरी विभागाच्या वतीने प्राजक्ता इनक्लेव हॉल बसंत बहार रोड येथे आयोजित शिबिरात सागर घोरपडे, माथाडी कामगार सेना शहरप्रमुख राज जाधव उपस्थित होते. लाईन बझार विभागाच्या वतीने स्वामी स्परुपानंद हॉल, लाईन बझार येथे राजू काझी, सुहास डोंगरे, शिवसेना कर्मचारी सेना वालावलकर कापड दुकान यांच्या वतीने वालावलकर कापड दुकान महाराणा प्रताप चौक येथे जेष्ठ शिवसैनिक दीपक गौड, शाखाप्रमुख सुनील निकम, प्रकाश दिवसे, सागर गिरी, अमोल लोखंडे, आदी कर्मचारी उपस्थित होते. लक्ष्मीपुरी विभागाने बिंदू चौक येथे घेतलेल्या शिबिरात अजित गायकवाड, सुनील खोत, सौ. पूजा भोर, सौ.पूजा कामते, मुकुंद मोकाशी, अमोल बुद्ढे आदी उपस्थित होते.
यासह शिवसेना सीपीआर कर्मचारी सेनेच्या वतीने सीपीआर येथे गोरगरीब रुग्णांना सीपीआर रुग्णालय येथे शाखाप्रमुख अनिल माने यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आले. युवासेनेच्या वतीने अंधशाळा मिरजकर तिकटी येथे अंध मुलांना आणि शिवसेना लक्षतीर्थ विभागाच्या वतीने मातोश्री वृद्धाश्रम, चंबुखडी येथे स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वृद्धाश्रम संस्थापिका श्रीमती वैशाली राजशेखर, शिवसेना उपशहरप्रमुख रमेश खाडे, विशाल कवाळे, राजू मोहिते, अमिल सुतार, रतन पाटील, मनोज तपकिरे, सचिन भोळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!