रेड बुल टशन पश्चिम विभागीय आवृत्तीचे इस्लामपूर व्यायाम मंडळ पुणेरी पलटण बरोबर करणार सराव

 

पुणे: कॉलेज आणि क्लब पातळीवरच्या खेळांडूंसाठी रेड बुल टशन या चढाओढीच्या कबड्डी स्पर्धेच्या पहिली पश्चिम भारत आवृत्ती अटीतटीच्या अंतिम फेरीतील सामन्यांसहित फोनिक्स मार्केट सिटीत 13 मे रोजी संपन्न झाली. ओम कबड्डी संघ, सरकारी उच्च माध्यमिक शाळा आणि इस्लामपूर व्यायाम मंडळ ज्यांनी अनुक्रमे पुणे, गोवा आणि सांगली येथे पात्रता फेरी पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करताना जिंकली होती त्यांनी रेड बुल टशन पश्चिम आवृत्तीच्या अंतिम फेरीत प्रत्येकी दोन सामने खेळले. इस्लामपूर व्यायाम मंडळ, सांगलीने ओम कबड्डी संघ, पुणेवर मात करीत अंतिम फेरीत बाजी मारून रेड बुल टशन 2018 पश्चिम विभागाचे अजिंक्यपद पटकावले.रेड बुल टशन 2018 पश्चिम विभाग आवृत्तीचे अंतिम फेरीचे निकाल ओम कबड्डी संघ पुणे कडून सरकारी उच्च माध्यमिक शाळा पराभूत: 39-19
इस्लामपूर व्यायाम मंडळ, सांगली कडून ओम कबड्डी संघ पुणे पराभूत: 44-15
इस्लामपूर व्यायाम मंडळ, सांगली कडून सरकारी उच्च माध्यमिक शाळा, गोवा पराभूत: 35-12

प्रो कबड्डी लीग फ्रॅंचइज असलेल्या पुणेरी पलटणच्या सहयोगाने आयोजित करण्यात आलेल्या यास्पर्धेचे प्राचीन आणि सदाबहार अशा या भारतीय खेळाचा तळागाळात आणखी विकास करण्याचे आणि खेळाची व्याप्ती वाढवण्याचे ध्येय आहे. विजेत्यांना पुणेरी पलटण बरोबर त्यांच्या घरच्या मैदानात या प्रो. कबड्डी लीगचा 6 वा सिझन चालू होण्याआधी ऑक्टोबरमध्ये सराव करण्याची संधी मिळेल.वय वर्ष 16-19 मधील खेळाडूंसाठी खुल्या असलेल्या आणि प्रो कबड्डी लीग सामन्यांच्या कालावधीच्या अर्धा काळ चालणाऱ्या रेड बुल टशन मध्ये डावपेच सामन्याचे महत्त्वाचे अंग ठरतात. प्रो. कबड्डी लीग मध्ये एक सत्र 20 मिनिटांचे असते तर या स्पर्धेत दोन्ही हाफ 10 मिनिटांचे म्हणजे संपूर्ण कालावधी 20 मिनिटे असेल.पुणेरी पलटणचे प्रशिक्षक अशन कुमार म्हणाले की “गेल्या काही काळात कबड्डीच्या सहभागात आणि युवकांच्या उत्साहात प्रचंड वाढ झाली आहे. रेड बुल टशन अशा युवकांना त्यांचे कौशल्य दाखवण्यासाठी उत्कृष्ट असे मोठे व्यासपीठ आहे. रेड बुल सारखे मोठे ब्रॅंड कबड्डी सारख्या खेळत गुंतवणूक करत आहेत आणि जोशपूर्ण युवकांना त्यांची गुणवत्ता दाखवण्याची संधी देत आहेत हे खूप उत्साहवर्धक आहे. काही खेळांडूनी आमचे खरोखर लक्ष वेधून घेतले आहे आणि इस्लामपूर व्यायाम शाळा, सांगलीचे आम्ही अभिनंदन करतो आणि आमच्या संघाबरोबर त्यांच्या सरावाबाबत आम्ही उत्साही आहोत.”पुणेरी पलटणचा अष्टपैलू खेळाडून संदीप नरवाल म्हणाला की “इथे बघायला मिळणारी गुणवत्ता थक्क करणारी आहे. अंतिम फेरीत आलेल्या तिन्ही संघाच्या कामगिरीने मी प्रभावित झालो आहे. रेड बुल टशनच्या अंतिम फेरीची रंगत आणि तीव्रता आपण बघितली आहे आणि पुढचा सिझन सुरू होण्याआधी सांगली संघाला पुणेरी पलटण बरोबर सराव करण्याची संधी मिळणार आहे जे खूप छान आहे. टशन सारखा उपक्रम हाती घेत रेड बुलने कौतुकास्पद कार्य केले आहे ज्यामुळे तळागाळातील खेळाडूंना अशा स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. प्रो कबड्डी लीगच्या प्री-सिझन मध्ये आमच्या बरोबर सराव करण्याची संधी मिळणार ही गोष्ट खूप उत्साहवर्धक आहे.”पुणेरी पलटणचा बचावपटू गिरीश इरनक म्हणाला की “या कार्यक्रमात असणे खूप छान वाटते. या खेळाडूंमध्ये असलेली गुणवत्ता फार उत्साहवर्धक आहे आणि टीम बरोबर पुढच्या सिझनच्या आधी सराव करायला मिळणे हा विजेत्या सांगली संघाला खूप चांगला अनुभव असेल. प्रचंड यशस्वी झाल्या बद्दल रेड बुल टशन 2018 चे अभिनंदन. माझ्या संघासाठी प्रो कबड्डीच्या चांगल्या सिझनची मी वाट बघत आहे.”या प्रसंगी बोलताना पुणेरी पलटणचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलेश कांडपाल म्हणाले की “आम्हाला वाटते की रेड बुल टशन हे तरुण आणि विपुल गुणवत्तेला देशाच्या तळागाळातून शोधण्याबाबत आणि खेळातील रुचि वाढवण्याबाबत आहे. पुणेरी पलटण आणि रेड बुल टशन यांचे खेळाच्या तळागाळातील विकासावर भर देऊन देशभरातील होतकरू खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखवण्यासाठी व्यासपीठ देण्याचे समान ध्येय आहे. विजेत्या संघाला पुणेरी पलटण बरोबर सराव करण्याची संधी मिळाली आहेच आम्ही रेड बुलटशन पात्रता फेरी दरम्यान इतर संघातून काही खेळाडू हेरले आहेत आणि आमच्या स्काउटींग कार्यक्रमा दरम्यान त्यांना ट्रायल्सची संधी देणार आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!