
कोल्हापूर: गेली २०वर्षे बंद अवस्थेत असलेले कोल्हापूरातील इ.एस.आय रुग्णालय आता उद्यापासून पूर्वरत सुरू होणार आहे. तसेच याचे उद्घाटन उद्या होणार नसून या हाँस्पीटलच्या उद्घाटनासाठी राज्याचे आरोग्य मंत्री, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील,संबंधित केंद्रीय मंत्री यांना येण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इ.एस.आय.रुग्णालयाचे बांधकाम१९९६ कामगार राज्य विमा महामंडळातर्फे बांधून पूर्ण करण्यात आले.१आँगस्ट रोजी इ.एस.आय.योजना संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात लागू करण्यात आली.पूर्वी लागू असलेल्या व नव्याने लागू झालेल्या लाखो लोकांचा विचार करून हे रुग्णालय सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू करण्यात आल्या. सदर रुग्णालय हे १००खाँटचे असून त्यातील पहिल्या टप्पा म्हणून आता उद्या ओ.पी.डी.विभाग तात्काळ सुरू करण्यात येणार आहे.तर वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. दुष्यंत खेडीकर यांची कामगार हाँस्पिटल अंधेरी येथून कोल्हापूर येथे नियुक्ती करण्यात आलेली आहे.तर ११स्पेशालिस्ट डॉक्टर व ८सिनिअर रेसिडेंट पदासाठी मुलाखती घेण्यात आल्या असून ७ स्पेशालिस्ट डॉक्टर व २सिनिअर रेसिडेंटंना रुग्णालयात रुजू होण्यास आज अखेर मुदत देण्यात आली असून ३स्पेशालिस्ट डॉक्टर व २ सिनिअर रेसिडेंटं हजर झाले आहेत.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात इ.एस.आय.विमाकृत व्यक्तींची संख्या ही सव्वा लाखापेक्षा जास्त असून त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या पाच लाखापर्यंत असणार आहे. सदर लोकांचा विचार करून सध्या मुबलक प्रमाणात औषधे व विविध वैद्यकीय उपकरणे सुसज्ज ठेवण्यात आलेली आहेत.
डॉ.दुष्यंत खेडीकर म्हणाले’ सध्या हाँस्पिटलमध्ये ३वैद्यकीय अधिकारी,५नर्स स्टाप,२फार्मासिस्ट,१रेडिओ ग्राफर,१०प्रशासकीय स्टाफ रुजू झालेला आहे.हाँस्पीटलमध्ये लँबोरेटरी,सेंकडरी उपचार लवकरच सुरू करण्यात येणार असून तोपर्यंत उपचारासाठी कोल्हापूरातील दोन हाँस्पिटलमध्ये सोय करण्यात आली आहे.
Leave a Reply