५०% टक्के स्त्री पुजारी नेमा या कायद्यामुळेच चालढकल -डॉ. सुभाष देसाईंचा आरोप

 

कोल्हापूर: श्री अंबाबाई पुजारी हटाव कायद्याची अमलबजावणी का होत नाही?अशी लाखो स्त्री-पुरुष भक्तांची विचारणा झाली तरी हे सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही.शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकरण्या मागे मनुवादी वृत्ती आहे.स्त्रियांना शूद्राती शुद्र समजण्याची बुरसटलेली विचारसरणी याला कारणीभूत आहे.याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा असावा.हीच वृत्ती श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव कायद्याच्या अंमल बजावणीच्या आड येत आहे.सात महिन्यापूर्वी झालेल्या या कायद्यामध्ये५०%स्त्री पुजारी नेमण्यात कारण श्री अंबाबाई हि स्त्री देवता असून तिला स्नान घालणे ,वस्त्र अलंकार नेसवने हि कामे स्त्रियांनी करावीत असा कायदा पारित झाला.पण त्यामुळे मनुवाद्यांचे पित्त खवळले पण त्याला उघड विरोध न दर्शवता त्यांनी सरसंघचालक मोहन भगवंतांना साकडे घालून ह्या कायद्याची अंमलबजावणीस विलंब लावला हे स्पष्ट झाले.हे सरकारच पुरोहितांचे आहे.मनुवादी आहे.त्यामुळे नवरात्र ,दसरा,दिवाळी, नाताळ, हे पर्यटकांचे ओघ मंदिराकडे आले.लाखो पर्यटकांनमूळे कायदा होऊनही त्यात टाळाटाळ झाली.पश्चिम महाराष्ट्र कमिटी कडे छ.शाहू वैदिक स्कूल चे १० पुजारी नियुक्त आहेत.त्यांना सर्व पूजाविधी येतात असे असताना विद्यमान पुजाऱ्यांना काढल्याने पूजा होणार नाही.हि थाप आहे समाजाची दिशाभूल आहे.कायदा केल्याने पुजाऱ्यांना बेहिशोबी संपत्ती मिळते आणि त्यात अर्थकारण दडलेले आहे.हे साऱ्या समाजाला कळून चुकले आहे.या कायद्याचा अवमान लोकशाहीच्या नावाखाली करणे हे महापाप आमचे तथाकथित पुढारी किती दिवस करणार ? आचार संहिता लागेपर्यंत हि चालढकल भक्तांच्या नव्हे तर चार चौघांचा हिताची आहे.या निवेदनावर श्री अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समितीचे डॉ.सुभाष देसाई ,व जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा डॉ. जयश्री चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!