
कोल्हापूर : संपूर्ण देशात ११ कोटी सदस्य असलेला सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी होय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीतर्फे सदस्य नोंदणी अभियान सुरु करण्यात येत आहे. ६ जुलै ते ११ ऑगस्ट पर्यंत हे अभियान सुरु राहणार असून भारतीय जनता पार्टीच्या वतीने या अभियानास “संघटन पर्व” असे नाव देण्यात आले आहे. भाजपा कोल्हापूर महानगरच्यावतीने महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सर्व सात मंडलामध्ये या अभियानाची मोठ्या उत्साहात सुरवात होणार आहे.
भाजपा मंडल निहाय प्रमुख चौकांमध्ये पुढील प्रमाणे निवृत्ती चौक, शाहू बँक चौक, जोशी गल्ली चौक, व्हिनस कॉर्नर, जनता बाजार चौक, दसरा चौक, लाईन बाजार चौक याठिकाणी मंडप उभारून भाजपा सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच भाजपा युवा मोर्चाच्यावतीने विवेकानंद कॉलेज येथे हे सदस्यता अभियान राबवण्यात येणार आहे. अभियानाची सुरवात वरील सर्व ठिकाणांहून उद्या शनिवार सकाळी १० वाजल्यापासून होणार आहे.
तरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य होऊ इच्छिणा-या नागरीकांनी वरील ठिकाणी भेट देऊन आशिया खंडातील सर्वात मोठ्या भारतीय जनता पार्टीच्या सदस्य नोंदणी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी केले आहे.
Leave a Reply