पायाखालची वाळू सरकल्यामुळेच विद्यमान चेअरमन यांच्याकडून धांदांत खोटे आरोप : माजी नगरसेवक संदीप नेजदार यांचा पलटवार
कोल्हापूर: राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सत्ताधाऱ्याकडून बनावट कागदपत्रे तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी माहिती मिळाल्यावर काही प्रमुख कार्यकर्ते कारखाना कार्यस्थळावर गेले. त्याचे सीसीटीव्ही चित्रीकरण सगळीकडे उपलब्ध आहे. कार्यकर्त्यांनी कोणालाही दमदाटी किंवा धक्काबुक्की केलेली नाही. […]