Uncategorized

‘ये रे ये रे पैसा’झी स्टुडिओजची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट

December 30, 2017 0

कोल्हापूर:दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित, झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे, ये रे ये रे पैसा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट, ती सध्या काय करते अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् प्रस्तुत ये रे ये रे पैसा हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.आज चित्रपटाची संपूर्ण टीम कोल्हापूरमध्ये प्रमोशन करिता आली असता सर्व कलाकार आणि चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक संजय जाधव यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले चित्रपटाची   कथा  आहे  पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर घडणारी मनोरंजनात्मक कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओ प्रायवेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. संवाद आणि पटकथा अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे यांनी तसेच छायाआरेखन आहे पुष्पांक गावडे यांचं. महेश साळगावकर यांचे कला दिग्दर्शन असून पंकज पडघन यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत अमितराज आणि पंकज पडघन यांनी. ये रे ये रे पैसा हे गाणं लिहिलंय सचिन पाठक यांनी तर स्वरबद्ध केलंय प्रवीण कुवर आणि जान्हवी प्रभूअरोरा यांनी. तर खंडाळ्याचा घाट हे गाणं अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत ह्या त्रिकुटाने चित्रीकरणाच्या वेळी लाईव्ह गायले असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे. साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल हे गाणे सचिन पाठक यांनी लिहिले असून ते वैशाली सामंत यांनी गायले आहे. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

Uncategorized

पंचगंगा घाट विकासासाठी 23 कोटीचा निधी मंजूर: पालकमंत्री चंद्रकांत पाटील

December 29, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापूरच्या पर्यटन विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करुन देवून नवे नवे प्रकल्प राबविण्यास प्राधान्य दिले असल्याचे सांगून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापूरचा पंचगंगा घाट विकासासाठी 23 कोटीचा निधी मंजूर केला आहे तर शाहू जन्मस्थळ याठिकाणी […]

Uncategorized

‘बारायण’ चित्रपट  १२ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

December 29, 2017 0

कोल्हापूर: शिक्षणाचे बाजारीकरण, बारावीच्या परीक्षेचा करण्यात आलेला अनुभव आणि त्यामधून पालकांना आलेले टेन्शन अशा विविध मुद्दयांवर अतिशय रंजक आणि खोचक पद्धतीनं दिग्दर्शक दीपक पाटील यांनी प्रकाश टाकून ‘बारायण’ या चित्रपटाची मांडणी केली आहे. चित्रपटातून निखळ कौटुंबिक मनोरंजनाबरोबरच सामाजिक […]

Uncategorized

प्लॉवर फेस्टिव्हलला सात लाख नागरीक व पर्यटकांची भेट

December 29, 2017 0

कोल्हापूर  : कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी जगात जे जे सुंदर दिसेल, ते ते कोल्हापूरात साकारण्यास प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही देवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, कोल्हापुरात येत्या 8 ते 13 फेब्रुवारी अशा सहा दिवसांचा कोल्हापूर महोत्सव आयोजित […]

Uncategorized

दुधाला प्रति लिटर ५ रु, तर दूध पावडरला ७ रु शासनानं अनुदान देण्याची खा.महाडिक यांची  संसदेत मागणी

December 29, 2017 0

खासदार धनंजय महाडिक यांनी आज देशाच्या सर्वोच्च सभागृहात, दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाला वाचा फोडली. ७ डिसेंबर रोजी कोल्हापुरात गोकुळ दूध उत्पादकांनी काढलेल्या मोर्चावेळी खासदार महाडिक यांनी दूध उत्पादकांच्या समस्या सोडवण्यासाठी संसदेत आवाज उठवू, असे जाहीर […]

Uncategorized

टेंडर टच फाऊंडेशनच्या डे केअर सेंटरचे उद्घाटन संपन्न

December 27, 2017 0

कोल्हापूर: कोल्हापुरात राजारामपुरी येथील ‘टेंडर टच फाउंडेशन’ च्यावतीने लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या डे केअर सेंटरचे उद्घाटन आज आ.डॉ. सुजित मिणचेकर भागीरथी महिला संस्थेच्या सौ.अध्यक्षा अरुंधती महाडिक टेंडर फाउंडेशनचे अध्यक्ष नितीन राजशेखर ,उपाध्यक्षा सौ. स्मिता […]

Uncategorized

महाराष्ट्रातील प्रथम भव्य-दिव्य कोल्हापूर प्लॉवर फेस्टिव्हलचा शुभारंभ

December 24, 2017 0

कोल्हापूर : कोल्हापूरच्या पर्यटनवाढीसाठी येत्या फेब्रुवारी मध्ये तीन दिवसांचा कला महोत्सव तर एप्रिल-मे या दोन महिन्यात 2-2 दिवसाच्या 40 ते 50 विनाशुल्क पर्यटन सहली आयोजित करण्याची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केली. […]

Uncategorized

भारत व चीन भागीदारीतील नवीन उत्पादने बाजारात येणार

December 23, 2017 0

नवी दिल्ली : भारतीय आणि चिनी आयटी कंपन्यांमध्ये संयुक्‍तपणे भागीदारी करण्यासाठी नॅस्कॉम आणि चीनमधील दालियान शहर यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. इन्फोसिस, टीसीएस, एचसीएल आणि अन्य काही कंपन्या यापूर्वीच चीनमध्ये आहेत. भारतीय कंपन्यांना सहजपणे चीनमधील […]

Uncategorized

नितीन राजशेखर आणि स्मिता सावंत (मांडरे) लहान मुलांसाठी टेंडर टच डे केअर सेंटर

December 23, 2017 0

कोल्हापूर : पाळणाघर ही संकल्पना आज नोकरी व व्यवसाय करणार्‍या दाम्पत्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनत आहे. विभक्त कुटुंब पद्धती मुळे घरामध्ये कोणी प्रौढ व्यक्ती नसते. आर्थिक गरजा झपाट्याने वाढत असल्याने नवरा बायको दोघांनाही नोकरी करणे […]

Uncategorized

मिसेस देशमुख’चित्रपटाचे चित्रीकरण सुरू

December 22, 2017 0

मराठी चित्रपटसृष्टीत आज विविधांगी विषयांवर आधारित चित्रपटबनण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. प्रत्येक दिग्दर्शक आपलं वेगळेपण जपत कथानकाची निवड करीत असून तितक्याच अनोख्याशैलीत सादरीकरण करीत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. काही चित्रपट शीर्षकापासूनच लक्ष वेधून घेण्याचं […]

1 2 3 64
error: Content is protected !!