स्टार प्रवाहच्या ‘गोठ’ या मालिकेत आणि मालिकेच्या सेटवर नेहमीचसगळे सण-उत्सव मोठ्या उत्साहानं साजरे होतात. मात्र, मालिकेतल्याअभिनेत्रींना महिलाच दिनाचं खास सरप्राईज मिळालं. सहकलाकारांकडून मिळालेल्या गिफ्ट्सनी सेटवर महिला दिन साजरा झाला.गोठ मालिकेला अभय म्हापसेकर, अर्थात सुशील इनामदार आणि बरूण मौर्य यांनी सुप्रिया विनोद (कांचन), क्षमा देशपांडे (बायोआजी), रुपल नंद (राधा), सुरभी भावे (दीप्ती), शलाका पवार (सुलेखा) यासहअभिनेत्रींना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्याच; सोबतच गुलाबआणि चॉकलेट्सही दिली. या सरप्राईजनं या सर्वजणी खूप खुशझाल्या. महिला दिनाच्या या सेलिब्रेशनविषयी सुप्रिया विनोद यांनीआवर्जून फेसबुकवर पोस्टही लिहिली. पोस्टमध्ये त्या म्हणतात, ‘आमच्या ‘गोठ’च्या सेटवर सगळे सणवारसाजरे होतात.अगदी एरवी घरी कधी केले नसतील इतके साग्रसंगीत! पण काल (वुमन्स डेला) व्यक्तिरेखा म्हणून नाही, माणूस म्हणून – स्त्रीम्हणून – कौतुक मिळालं अचानक ! सुशीलने लाल गुलाब दिले, वरुणनेचॉकलेट्स ! सगळीकडे ‘हॅपी वुमन्स डे ‘लिहिलेलं !स्त्री म्हणून आजवरमला काय मिळाले, काय नाही या खोलात मी शिरले नाही….मजावाटली न काय !’