फाउंड्री उद्योगाला जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील: उद्योजक विजय मेनन
कोल्हापूर:फाऊंड्री उद्योगाने नव्या तंत्रज्ञानाचास्वीकार करण्याची गरज आहे. येत्या२०३० ला इलेक्ट्रिक वाहने बाजार पेठेत येण्याची शक्यता आहे. येत्या पाच वर्षात फाऊंड्री उद्योगात आमुलाग्र बदल होणारआहेत. फाउंड्रीला उद्योग जागतिक दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. त्यापार्श्वभूमीवर नवे तंत्रज्ञान, प्रशिक्षण,कौशल्य विकास सुविधा स्वीकारण्याची गरज आहे. त्यासाठी द इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया फाऊंड्रीमेन (आयआयएफ) प्रयत्न करीत असल्याची माहिती मेनन अॅण्ड मेनन लिमिटेडचे अध्यक्ष आणि आयआयएफचे सेक्रेटरी विजय मेनन यांनी पत्रकार परिषदेत दिली.अध्यक्ष विजय मेनन म्हणाले, भारतीय फाउंड्री उद्योगासाठी आयआयएफ ही सर्वोच्च राष्ट्रीय औद्योगिक संघटना आहे.फाऊंड्री इंडस्ट्रिजमध्ये चीन नंतर भारताचा दुसरा क्रमांक आहे. फाऊंड्री उत्पादनातचीनचा ४४.६ टक्के आणि भारताचा १०.७७ टक्के वाटा आहे. देशात फाउंड्री उद्योगात ५ लाख लोक काम करतात. नव्या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहने बाजारातआणण्याचे धोरण आहे. त्याचा फटाका ऑटोमोबाइल क्षेत्राला बसणार आहे. देशात दरवर्षी सुमारे ३० लाख वाहने उत्पादितकेली जातात. कोल्हापूर जिल्ह्यात फाऊंड्री उद्योग मोठा आहे. नवीन कास्टिंग संकल्पना विकसित होत आहे. वाहनांचे सुटे पार्टतयार करणाऱ्या कोल्हापूरच्या इंडस्ट्रीजमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याची गरज आहे. त्यासाठीआयआयएफ प्रयत्न करीत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास फाउंड्री उद्योगाचे भवितव्य आहे. अन्यथा फाउंड्री उद्योगाची संख्या कमी होण्याची भीती आहे.आयआयएफचे देशभरात ३०२० सदस्यआहेत. तर ५०० फाऊंड्री आहेत. कोल्हापूर सांगली विभागात ४५० फाउंड्री असून २३५सदस्य आहेत. कौशल्य विकासासाठी सुपरवायझर प्रशिक्षणासह प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु आहे. चीन सारखा देशउत्पादनात आघाडीवर आहे. चीनने उद्योगात मोठी गुंतवणूक केली आहे. सध्या चीनमधील ऊद्योग व्यवसायावर परिणाम […]