Uncategorized

‘रणांगण’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर स्टार प्रवाहवर

October 25, 2018 0

सचिन पिळगावकर आणि स्वप्निल जोशी या दिग्गज अभिनेत्यांच्या अभिनयाने नटलेला ‘रणांगण’ हा सिनेमा पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. स्वप्नील जोशीचं आजवर न पाहिलेलं रुप या सिनेमातून पाहता येईल. या सिनेमात जे रणांगण आहे ते नात्यांमधील […]

Uncategorized

भेटी लागी जीवातल्या रंगकर्मी अरूण नलावडेंच्या दर्जेदार भूमिकांमध्ये तात्यांची भर

October 25, 2018 0

सोनी मराठी वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्यामनात हक्काचे स्थान निर्माण केलंय आणि याचेएकमेव कारण म्हणजे सोनी मराठी वाहिनीवरीलमनोरंजक मालिका. या वाहिनीवरील सर्वचमालिका लोकप्रिय होतं आहेत आणि प्रत्येकमालिकेत एक नाविन्य, वैशिष्ट्य आहे. त्यापैकी‘भेटी लागी जीवा’ या मालिकेचे वैशिष्ट्ये म्हणजेया मालिकेतील कलाकार आणि कथा. ३ पिढ्याआणि त्यातील प्रमुख पुरुष मंडळी यांच्या नात्यावरआधारित कथा मांडून सोनी मराठीने एक उत्तममालिका प्रेक्षकांसाठी आणली आहे. ३ पिढ्या,त्यांचे स्वभाव, त्यांची मतं, त्यांचा एकंदर वावरयाच्या अवती-भवती फिरणारी ‘भेटी लागीजीवा’ची कथा खूप सुंदर पध्दतीने मांडली जातआहे. आणि ही कथा तितक्याच सुंदर पध्दतीनेयातील ३ पिढ्यांतील प्रमुख पुरुष पात्र साकारणारेकलाकार अरुण नलावडे (तात्या), समीरधर्माधिकारी (विकास) आणि श्रेयस राजे (विहंग)यांनी पडद्यावर सादर केली आहे. एकापाठोपाठ एक दर्जेदार भूमिका करणारे ज्येष्ठरंगकर्मी अरूण नलावडे तात्यांच्या रूपातप्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांच्या पात्राचंवैशिष्ट्य म्हणजे जागोजागी भारूडाचे कार्यक्रमकरणाऱ्या तात्यांच्या वाणीत ऐकू येणाऱ्या ओव्याआणि त्या ओव्यांभोवती गुंफलेलं तात्यांचं आयुष्य.डिजे-रिमिक्स च्या या काळात गवळण, भारूड,भजन, किर्तनसारखे शब्द कानावर पडणं दुर्मिळचं.मात्र सध्या सोनी मराठीवर सुरू असलेल्या यामालिकेच्या निमित्ताने कानी पडणारे हे शब्दप्रेक्षकांना खूपच भावत आहेत. त्यात तात्यांकडूनया एकंदर नाट्याला मिळणारी भारूडाची जोडकौतुकास्पद आहे. केवळ भारूड किंवा किर्तनचनाही तर अरूण नलावडे म्हणजेच तात्यांना दिलेलेसंवाद ही तितक्याच ताकदीचे आहेत. हल्लीच्याचएका भागात, ” आशिर्वादाला ओझं समजून परतकरायला आले की काय…” म्हणणाऱ्या तात्यांचेसंवाद भाव खाऊन जात आहेत. त्यात मालिकेच्याअनुशंगाने सादर होणारं भारूड प्रेक्षकांना आपल्यामुळांशी घट्ट जोडून ठेवत आहे.भारूडाशी जोडलेली तात्यांची पिढी, बिझनेस हेचसर्वस्व समजणारा मध्यमवयीन विकास आणितारूण्याशी नुकतीच ओळख झालेला तरूणम्हणजे विहंग.  मुलगा-वडील-नातू अशी ही तीनपिढी, त्यांच्यातील पुरेसा नसणारा संवाद, भावनायावर आधारितल ‘भेटी लागी जीवा’ मालिकेतीलया तिघांच्या नात्यामध्ये पडलेली दरी कशी भरतजाते हे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  अरुणनलावडे, समीर धर्माधिकारी आणि श्रेयस राजेयांनी त्यांच्या भूमिका इतक्या चोख पार पाडल्याआहेत की ही कथा जणू आपल्या सभोवतालीघडतेय असं वाटून प्रेक्षक मालिकेला मनापासूनदाद देत आहेत. आजोबा आणि नातू यांची योगायोगाने झालेलीभेट प्रेक्षकांसाठी आनंददायी क्षण असेल पणत्यांच्या नात्याची खरी ओळख त्यांना कधी होईल हेजाणून घेण्यासाठी पण प्रेक्षक नक्कीच उत्सुकअसतील. आपल्या वडीलांना भेटवण्यासाठी जेव्हाविहंग तात्यांना घेऊन त्याच्या घरी जाईल तेव्हाकाय घडेल अन् कसं घडेल हे पाहण्यासाठी बघतराहा ‘भेटी लागी जीवा’ सोमवार ते शनिवार रात्री१०:३० वाजता फक्त सोनी मराठी वर.

Uncategorized

झी स्टुडीओज् व नागराज मंजुळे निर्मित ‘नाळ’ येत्या १६ नोव्हेंबरला प्रदर्शित 

October 25, 2018 0

दर्जेदार चित्रपट आणि झी स्टुडीओज् हे समीकरणप्रेक्षकांसाठी काही नवीन नाही. गेल्या काही वर्षांत मराठीतील चित्रपटांनी विविध विषयांना हात घालत, अनोख्या पद्धतीने मांडणी करत मराठी चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवलं आहे. ‘फँड्री’ आणि ‘सैराट’सारख्या चित्रपटांच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडीओज्आणि नागराज पोपटराव मंजुळे “नाळ” नावाचा चित्रपटप्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. सुधाकर रेड्डीयक्कंटी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून येत्या १६नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होत आहे. सुधाकरयांनी सैराट, विहीर, देऊळ आणि वीरे दि वेडिंग सारख्यासिनेमांचे छायाचित्रीकरण केले असून, ‘नाळ’ मधून ते दिग्दर्शनातील पदार्पण करीत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला. या सोहळ्याला नागराज मंजुळे,दिग्दर्शक […]

Uncategorized

माणसांचा जीव जाण्याची वाट पाहू नका, अन्यथा अधिकाऱ्यांना रस्तावर फिरू देणार नाही :आ.राजेश क्षीरसागर 

October 24, 2018 0

कोल्हापूर  : कोल्हापूर शहराला पडलेला डेंग्यू आणि स्वाईन फ्ल्यूचा विळखा सुटत नसल्याचे दिसते. या साथींच्या रोगात नागरिकांचे जीव जात असून, प्रशासन गप्प बसले आहे. शुक्रवारी डेंग्यूने उदयोन्मुख युवा फुटबॉल खेळाडूचा, तर स्वाईन फ्ल्यूने वृद्ध डॉक्टरांचा बळी […]

Uncategorized

कोल्हापुरात पुन्हा माणुसकीच्या भिंत २ व ३ नोव्हेंबरला सीपीआर चौकात आयोजन

October 24, 2018 0

कोल्हापूर : सलग तिसऱ्या वर्षी यंदाच्या दिपावलीच्या पुर्वसंध्येला ‘नको असले ते द्या, हवे ते घेवून जा’ हे ब्रिद वाक्य घेवून पुन्हा माणुसकीची भिंत उभी राहत आहे. कोल्हापूकरांनी उत्स्फूर्तपणे दिलेली जूनी परंतू वापरायोग्य कपडे गरजूंना मिळावित […]

Uncategorized

भाविकांसाठी बॅटरी कार आणि भक्त निवास उभारणार: महेश जाधव

October 24, 2018 0

कोल्हापूर: कोल्हापूर हे तीर्थ क्षेत्र म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी राहण्याची सोय व्हावी यासाठी भक्त निवासाची उभारणी करण्यात येणार आहे तसेच सध्या दोन बॅटरी कार भाविकांना कोल्हापूर मध्ये फिरण्यासाठी उपलब्ध करण्याचा विचार आहे […]

Uncategorized

अंबाबाई मंदिरात 25 हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

October 24, 2018 0

कोल्हापूर: शुद्ध अश्विन म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी नवरात्र उत्सव निमित्ताने साडे तीन शक्ती पीठा पैकी एक असणाऱ्या श्री महालक्ष्मी म्हणजे श्री अंबाबाई मंदिरात श्री महालक्ष्मी भक्त मंडळा च्या वतीने दरवर्षी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात […]

Uncategorized

स्वप्नाची ‘संहिता’ माधुरीमधून करणार मराठीत पदार्पण

October 24, 2018 0

मराठी चित्रपटसृष्टीत आई आणि मुलींच्या अनेक सुपरहिट जोड्या आपल्याला पाहायला मिळतात. दिग्दर्शनात तसेच अभिनयात वरचष्मा गाजवणाऱ्या या सेलिब्रिटी मायलेकींच्या यादीत आता दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आणि त्यांची लेक संहिता जोशीचा देखील समावेश झाला आहे. आगामी […]

Uncategorized

राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धा: विद्यापीठास सलग दुसऱ्यांदा विजेतेपद

October 23, 2018 0

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात गेल्या दोन दिवसांपासून उत्तरोत्तर रंगत गेलेल्या ‘जश्न-ए-कव्वाली’ अर्थात तिसऱ्या राष्ट्रीय आंतर-विद्यापीठ कव्वाली स्पर्धेत यजमान शिवाजी विद्यापीठाच्या संघाने सलग दुसऱ्यांदा स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. मुंबई विद्यापीठाच्या संघाला सह-विजेतेपद जाहीर करण्यात आले.शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर […]

Uncategorized

निकलोडियनच्या मोटू पतलू दि चँलेंज ऑफ कुंग फू ब्रदर्सचा मेगा टेलिव्हिजन प्रीमिअर

October 21, 2018 0

मोटू पतलू या लहान मुलांच्या अतिशय आवडीच्या पात्रांनी चंद्रावर , पाण्याखाली आणि कुंगफू लँडवर आपली छाप सोडल्यानंतर आता आनंद,विनोद आणि साहस पुन्हा सुरू करण्याची तयारी केली आहे. देशभरांतील लोकप्रिय अशी ही जोडी आता दोस्ती, बेजोड […]

1 12 13 14 15 16 62
error: Content is protected !!