Uncategorized

देशातल्या भिकाऱ्यांची यादी जाहीर

March 21, 2018 0

मुंबई (स्पीड न्यूज नेटवर्क) : संपूर्ण देशात 4 लाख 13 हजार 760 भिकारी असल्याची धक्कादायक माहिती सामाजिक न्याय विभागाच्या अहवालातून समोर आली आहे. सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गेहलोत यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नावर उत्तर देताना […]

Uncategorized

आ. राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून आठ रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत

March 19, 2018 0

कोल्हापूर : आमदार राजेश क्षीरसागर यांची रुग्णसेवा गेली आठ वर्षे अविरतपणे सुरु आहे. दोन आठवड्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यासह आसपासच्या परिसरातील दहा रुग्णांना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे आठ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली […]

Uncategorized

नोकरीला रामराम करून एतशा संझगीरी झाली ‘छोटी मालकीण’

March 19, 2018 0

नाटक, चित्रपट, अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना, चांगलीचाललेली नोकरी सोडून एक तरुणी अभिनेत्री होण्यासाठी धडपडकरते… तिचं नशीबही तिला साथ देतं… स्टार प्रवाहच्या ‘छोटीमालकीण’ या नव्या मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची सुवर्ण संधीतिला मिळते आणि तिचं छोट्या पडद्यावर भव्य पदार्पणही होतं… ही प्रेरणादायी कथा आहे ‘छोटी मालकीण’ एतशा संझगीरीची! स्टारप्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या नव्या मालिकेत एतशा ‘रेवती’ ही प्रमुखव्यक्तिरेखा साकारत आहे. एतशानं सायन्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर ती नोकरीही करत होती. मात्र, नोकरीत काही मन रमत नव्हतं. कथकचं शिक्षण घेत असल्यानं परफॉर्मन्सची भीती वाटत नव्हती. अशातच तिच्या समोर संधी चालून आली ती एका सौंदर्य स्पर्धेची. त्याततिची अंतिम फेरीसाठी निवड झाली. तिला एक पुरस्कारही मिळालाआणि तिचं नशीब पालटलं. दशमी क्रिएशन्सनं तिला हेरलं आणि ‘छोटीमालकीण’ या नव्या मालिकेसाठी तिची निवड झाली. पहिल्याचमालिकेत तिला डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, निखिल राजेशिर्के, प्रदीप पंडित, प्रतीक्षा जाधव, पूजा नायक अशाअनुभवी कलाकारांसह काम करण्याची संधी मिळाली आहे. “माझ्यासाठी हा सगळाच प्रवास अद्भुत आहे. कारण, मलाअभिनयाची, नाटकाची, चित्रपटाची कसलीच पार्श्वभूमी नाही. घरीकुणीही या क्षेत्रात नाही. नोकरी करणारी मुलगी ते अभिनेत्री हा जेमतेमएका वर्षात घडलेला प्रवास आहे. या सगळ्यात माझ्या आई-वडिलांनीमला खूप खंबीर पाठिंबा दिला. आजपर्यंत स्टार प्रवाहच्या मालिकापहात होते. आता त्याच चॅनेलवर आपण दिसणार याचा आनंद खूपचप्रचंड आहे,’ असं एतशानं सांगितलं. “छोटी मालकीण म्हणजेच ‘रेवती’ या व्यक्तिरेखेच्या काही छटामाझ्याशी मिळत्याजुळत्या आहेत. तसंच मालिकेची कथाही मला खूपआवडली. त्यामुळे ही मालिका करावीशी वाटली. अजून एक महत्त्वाचंकारण म्हणजे स्टार प्रवाह. स्टार प्रवाहनं कायमच नव्या कलाकारांनासंधी दिली आहे. पहिल्याच मालिकेत एवढ्या मोठ्या चॅनेलसह, डॉ. गिरीश ओक, वंदना वाकनीस, अक्षर कोठारी, अशा दिग्गजअभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी मिळणं स्वप्नवत आहे. मला हामहत्वपूर्ण ब्रेक दिल्यामुळे मी स्टार प्रवाहची ऋणी आहे. आमचीनिर्मिती संस्था दशमी क्रिएशन्सनंही मला सांभाळून घेतलं. मला खात्रीआहे, ‘छोटी मालकीण’ प्रेक्षकांना नक्की आवडेल.” असं एतशानंउत्साहाने सांगितलं. मोठ्या घरातल्या लाडावलेल्या मुलीची गोष्ट असलेली ‘छोटी मालकीण’ ही मालिका १९ मार्चपासून नक्की पहा सोमवार ते शनिवार रात्री ९वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

Uncategorized

आगामी ‘बबन’ सिनेमावरचे ‘मेकिंग ऑफ बबन’ पुस्तक प्रकाशित 

March 19, 2018 0

पुणे : आतापर्यंत अनेक गाजलेल्या पुस्तकांवर चित्रपट बनली आहेत, मात्र एका चित्रपटावर पुस्तक काढण्याची हि पहिलीच वेळ आहे ! द फोक कोनफ्लूअन्स इंटरटेंटमेंट प्रस्तुत व चित्राक्ष फिल्म्स निर्मित ‘बबन’ या सिनेमाच्या जडणघडणीचा अखंड लेखाजोखा मांडणारे ‘मेकिंग ऑफ बबन’ हे पुस्तक […]

Uncategorized

सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदाने उभारली एन.डी.स्टुडीयोची भव्य ‘गुढी’

March 19, 2018 0

नितीन चंद्रकांत देसाई यांच्या संकल्पनेतून कर्जत येथील एन.डी.स्टुडियोत उदयास आलेल्या बॉलीवूड थीमपार्कमध्ये गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, बॉलीवूड अभिनेता गोविंदाच्या हस्ते मराठी नववर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या शृंगाराने सजलेल्या या बॉलीवूड थीमपार्कात दि. १७ आणि १८ […]

Uncategorized

रणांगणातून समोर येणार खल-नायक स्वप्नील

March 19, 2018 0

गेली कित्येक वर्ष तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवणारा मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी आता खलनायकी भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला आहे. नेहमीच गोड भूमिकांमधून आपल्यासमोर आलेल्या स्वप्नील जोशीचा एक वेगळा लूक नुकताच लाँच झाला. रणांगण चित्रपटाच्यानिमित्ताने […]

Uncategorized

आंतरराष्ट्रीय रेसिंग स्पर्धेत लक्ष्यवेधी कामगिरी केल्याबद्दल कृष्णराज महाडिक चेन्नईत एफ एम एस सी आय कडून सन्मानित

March 19, 2018 0

देश -विदेशात होणार्‍या दुचाकी – चारचाकी रेसिंग स्पर्धा – चॅम्पियनशिपमध्ये भरीव कामगिरी केलेल्या रेसर्सना, फेडरेशन ऑफ मोटर स्पोर्टस इंडिया, एफ एम एस सी आय या नामांकित संस्थेच्या वतीनं सन्मानित केलं जातं. यंदाचा हा पुरस्कार सोहळा […]

Uncategorized

कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करणार :चंद्रकांतदादा पाटील

March 19, 2018 0

मुंबई : कोल्हापूर जिल्ह्यातील रस्त्यांसाठी १३ कोटी ४३ लाख आजतागायत खर्च झाले असून, मजबुत रस्ते बांधण्यासाठी ६८ लाख मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्यासंदर्भात कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत […]

Uncategorized

कोल्हापूर शहराला समस्या मुक्त करण्यासाठी सार्वजनिक वाहतुक मंत्रालय विभाग सर्वतोपरी मदत करेल ना:नितीन गडकरी 

March 15, 2018 0

कोल्हापूर : महानगरपालिकेतील भाजप- ताराराणी आघाडीचे नगरसेवक सध्या दिल्ली अभ्यास दौर्‍यावर गेले आहेत. खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली या नगरसेवकांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेचे बळकटीकरण, शिवाजी पुलाला […]

Uncategorized

भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांना  सुपर वुमन पुरस्कार प्रदान

March 15, 2018 0

ठाणे: भागीरथी संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी नियोजनबद्ध आणि प्रभावी  काम केल्याबद्दल तसेच खासदार धनंजय महाडिक यांच्याबरोबरीने सामाजिक, राजकीय उपक्रमात योगदान दिल्याबद्दल, अमृतवेल लाईफ स्टाईल मंचच्यावतीने, सौ. अरूंधती महाडिक यांना नुकताच सुपर वुमन पुरस्कार प्रदान करण्यात […]

1 51 52 53 54 55 62
error: Content is protected !!