Uncategorized

 ‘माधुरी’ चित्रपटातील ‘सॉरी’ गाणं लॉंच

November 27, 2018 0

पुणे:मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, स्वप्ना वाघमारे जोशीदिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुखभूमिका असलेल्या ‘माधुरी’ या चित्रपटाची पत्रकारपरिषद नुकतीच पुणे येथे आयोजित करण्यातआली होती. या पत्रकार परिषदेत निर्माते मोहसिनअख्तर, प्रेझेंटर उर्मिला मातोंडकर, संगीतकारअवधूत गुप्ते, गायक स्वप्नील बांदोडकर, कलाकारसोनाली कुलकर्णी, संहिता जोशी, अक्षय केळकर, विराजस कुलकर्णी आणि या चित्रपटाचे लेखकसमीर अरोरा उपस्थित होते. पत्रकार परिषदेत पत्रकारांना या चित्रपटाचा ट्रेलरदाखवण्यात आला. सोनाली कुलकर्णीनेसाकारलेली एका  तरुणीची भूमिका, सध्या तरुणपिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईटप्रसंग, आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरेजाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करावे हे याट्रेलरमध्ये पाहायला मिळते. तसेच सोनालीकुलकर्णी, शरद केळकर, संहिता जोशी, अक्षयकेळकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या पात्रांचीझलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो. पत्रकारांनीया ट्रेलरला पसंती दर्शवून या चित्रपटाच्या टीमशीमनमोकळ्या गप्पा मारल्या. चित्रपटा दरम्यानघडलेले अनेक किस्से पत्रकारांनी जाणून घेतले. या पत्रकार परिषदते घडलेली आणखी एक खासगोष्ट म्हणजे या चित्रपटातील अवधूत गुप्ते यांच्याआवाजातील ‘सॉरी’ हे गाणं पुण्यातील पत्रकारांच्याउपस्थित प्रदर्शित करण्यात आले. या गाण्यासाठीघेतलेली खास मेहनत आणि सॉरी म्हणतानानेमक्या काय भावना मनात असतात हे गाण्यातूनमांडतानाचा अनुभव याविषयी पत्रकारांसोबत गप्पा रंगल्या.मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचापहिला मराठी चित्रपट, सोनाली कुलकर्णीचा हटकेलूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय यासगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी’चित्रपट ३०नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

Uncategorized

‘स्टार प्रवाह’ वाहिनीची दशकपूर्ती

November 27, 2018 0

प्रेक्षकांना निखळ मनोरंजन देण्याच्या हेतूने स्टार प्रवाह वाहिनी उदयास आली आणि बघता बघता १० वर्ष झाली… मनोरंजनाचा हा प्रवाह गेली १० वर्ष अखंडपणे सुरु आहे तो प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच. रसिक प्रेक्षकांचं निर्व्याज प्रेम हाच या प्रवाहाचा […]

Uncategorized

‘माऊली’ चित्रपटातून रितेश देशमुख सह अजय-अतुल करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण!

November 27, 2018 0

अनेक हिंदी अभिनेत्यांना रुपेरी पडद्यावर आपल्यासंगीताच्या तालावर नाचायला लावणारी विख्यातसंगीतकार जोडगोळी अजय-अतुल आता ‘माऊली’  या रितेश देशमुख निर्मित आगामी मराठी चित्रपटातझळकताना दिसून येणार आहेत.रितेश देशमुख यांच्या विनंतीचा मान राखून अजय-अतुल या संगीतकार बंधूंनी ‘माझी पंढरीची माय’ यागाण्याद्वारे रुपेरी पडद्याची शोभा आणखीनद्विगुणित केलेली आहे. चित्रपटादरम्यान यागाण्याचे शूटिंग सुरु असतानाच रितेश देशमुखयांनी अजय-अतुल आणि चित्रपटातील प्रमुखअभिनेत्री सैय्यमी खेर यांच्यासह एक खासप्रचारात्मक व्हिडिओ शूट केला आहे. रितेश देशमुख म्हणतात की, “अजय अतुल यासंगीतकार जोडीस मी या भक्तिपूर्ण गाण्याचे संपूर्णसंक्षिप्त स्वरूप दिले होते आणि त्यानंतर त्यांनीमला त्यांच्या संगीत रचनांनी आश्चर्यचकित करूनसोडले. मी त्यांना दिलेल्या गाण्याच्या संक्षिप्तमाहितीच्या अगदी उलट असं गाणं त्यांनीमाझ्यासमोर प्रस्तुत केलं. खरंतर त्यांच्या संगीतरचनेने आमच्या चित्रपटाच्या पटकथेचा आढावाघेतला व चित्रपटाच्या चांगल्यासाठीच त्यात बदलकेले.”‘माझी पंढरीची माय’ या गाण्याद्वारे रुपेरीपडद्यावरील पदार्पणाबद्दल सांगताना अजयगोगावले म्हणतात की, “या व्हिडिओत आम्हीअसावं, ही रितेशची ईच्छा होती.” तर अतुलगोगावले सांगतात की, “रितेशने आम्हाला गाणीतयार करण्यास संपूर्ण स्वातंत्र्य दिले. सैराट(२०१६) नंतर आता पुन्हा ‘माऊली’ या मराठीचित्रपटासाठी काम करण्यास आम्हाला खूप आनंदझाला.

Uncategorized

लवकरच प्रेक्षकांच्या ‘डोक्याला शॉट’ !

November 27, 2018 0

बालक पालक’ आणि ‘येल्लो’ सारख्या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर ‘अ व्हिवा इनएन प्रॉडक्शन’ आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची  मेजवानी घेऊन येत आहे. उत्तुंग हितेंद्र ठाकूर यांची  निर्मिती असलेला  ‘डोक्याला शॉट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला […]

Uncategorized

गगनबावडा तालुक्यातील तळये येथे सांस्कृतिक हॉलचे भूमिपूजन

November 27, 2018 0

गगनबावडा: तालुक्यातील तळये आणि परिसरातील नागरिकांना उपयुक्त अशा सांस्कृतिक हॉलची निर्मिती या ठिकाणी होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या सण-समारंभाची सोय झाली आहे, त्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. तळये येथे […]

Uncategorized

मधुमेंहीची औषधे कमी करण्यात फ्रीडम फ्रॉम डायबेटिस फौंडेशनचे यश

November 27, 2018 0

मुंबई : इंटरनॅशनल जर्नल ऑफ डायबेटिस अँड एंडोक्राइनोलॉजीच्या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये फ्रीडम फ्रॉम डायबेटिस रिसर्च फौंडेशनचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. हा शोधनिबंध जीवनशैलीतील बदलांमुळे टाईप 2 मधुमेहींना झालेले फायदे या विषयावर आहे.यामध्ये विशेषत: वनस्पतींवर आधारित […]

Uncategorized

सहा वर्षे चिमुकल्या केदार साळुंखेने स्केटिंगद्वारे केला विश्वविक्रम

November 27, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूर मधील सहा वर्षीय चिमुकला केदार साळुंखे यांनी सांगली ते कोल्हापूर स्केटिंगच्या माध्यमातून ५५ किलोमीटरचे अंतर ३.३८मिनिटात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे. त्याच्या या धाडसाचे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे. आज […]

No Picture
Uncategorized

मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडियाने सुरू केले एअरकंडीशनचे अद्वितीय शोरूम

November 27, 2018 0

कोल्हापूर:उत्तमश्रेणीच्या वातानुकूलन यंत्रांचे जगातील आघाडीचे उत्पादक  मित्सुबिशी इलेक्ट्रिक यांनी निवासी वापरासाठीच्या वातानुकूलन यंत्रांचे (एअर कंडिशनर्सचे) एक खास आणि अद्वितीय “संकल्पना शोरूम राजारामपुरी, कोल्हापूर  येथे सुरु केले आहे.  या खास शोरूमचे नाव आहे एम ई क्यू- हिरोबा, ज्यात मित्सुबिशी इलेक्ट्रिकच्या उच्चआणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दर्जाच्या, टिकाऊ आणि तरीही माफक किमतीच्या उत्पादनांचे अनेक विविध प्रकार उपलब्धआहेत. मित्सुबिशी इलेक्ट्रिक क्वालिटी (एमई क्यू) हे उत्पादने, सेवा, भागीदारी, आणि लोकांच्या माध्यमातून दर्जा उत्तम राखण्याचे काम करते, जेणेकरून ग्राहकांना सर्वोत्तम सेवा मिळावी. हिरोबा या जपानी शब्दाचा अर्थ आहे लोकांना जाहीर ठिकाणी एकत्र येण्याची जागा, आणि एम ई क्यू हिरोबा ही अशी जागा असेल जिथे नवीन तंत्रज्ञानासंबंधी माहिती सगळ्यांना कळणार आहे.मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया (एम ईआय) चे संचालक आणि वातानुकूलनयंत्र विभागाचे व्यावसायीक प्रमुखअसलेले श्री योझो आयटो यांच्याम्हणण्यानुसार, “या एका खास प्रकारच्या शोरूम आहेत जिथे मित्सुबिशी इलेक्ट्रिक वातानुकूलन यंत्रांचे  प्रदर्शन आणि विक्री होईल जिथे ग्राहकांना ही उत्पादने प्रत्यक्ष हाताळून बघता येतील.  त्यामुळे मित्सुबिशी इलेक्ट्रिक या एका उच्च श्रेणीच्या वातानुकूलन यंत्रांच्या  ब्रॅण्डबद्दल लोकांमध्ये जागरूकता वाढेल. या खास शोरूम मध्येमित्सुबिशी इलेक्ट्रिक च्या उत्पादनांचे सगळे प्रकार असतील, ज्यात रूम एअर कंडिशनर्स,पॅकेज्ड एअर कंडिशनर्स, सिटी मल्टी वी आरएफ सिस्टिम्स आणि जेट टॉवेल्स यांचासमावेश होतो. ” श्री नीरज गुप्ता, वरिष्ठ महाप्रबंधक, लिविंगएंवीरोन्मेन्ट, मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडीया(एम ई आय) यांच्या म्हणण्यानुसार,” भारतातील अनेक ग्राहक आजही खरेदीकरण्याआधी वस्तू हाताळून बघणे पसंतकरतात. असे अनेक ग्राहक आहेत ज्यांनाखरेदी करताना कुणाचे तरी मार्गदर्शन हवेअसते. एम ई क्यू कूलिंग प्लॅनेट्स ही  अद्वितीय कल्पना आहे  कारण त्यामध्येग्राहकांना दुकानात जाऊन, उत्पादने नीटहाताळून, मग खरेदी करण्याचा निर्णय घेतायेतो. तर दुसरीकडे, एम ई क्यू हिरोबावातानुकूलन क्षेत्रातील सगळ्या आधुनिकतंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती ग्राहकांनादेते. मित्सुबिशी इलेक्ट्रिक इंडिया (एम ईआय) विषयी: शंभर वर्षांहून अधिक काळापासून  विश्वासार्ह आणि दर्जेदार उत्पादने देणारीमित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन(TOKYO:६५०३) ही कंपनी माहितीविश्लेषण संप्रेषण, अवकाश विज्ञान आणिउपग्रहाद्वारे संप्रेषण, ग्राहकोपयोगीइलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक तंत्रज्ञान, ऊर्जा,दळणवळण, आणि बांधकाम यंत्रसामुग्री यासगळ्यांना लागणाऱ्या इलेक्ट्रिकल आणिइलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामुग्रीचे उत्पादन, विक्रीआणि सेवा यामधील अव्वलदर्जाचीजगद्विख्यात कंपनी आहे. त्यांचे समूहघोषवाक्य ” चेंजेस फॉर द बेटर(चांगल्यासाठी बदल), आणि त्यांचेपर्यावरणीय घोषवाक्य, इको चेंजेस(पर्यावरणासाठी बदल), या दोन्हींमधूनमित्सुबिशी इलेक्ट्रिक एक जागतिक स्तरावरपर्यावरणाचे जतन करणारी आणितंत्रज्ञानाद्वारे समाजाला समृद्ध करणारीकंपनी बनण्याचे ध्येय बाळगून आहे. कंपनीने ३१ मार्च २०१८ मध्ये संपलेल्या आर्थिकवर्षात कंपनीच्या पूर्ण उद्योगसमूहाची एकूणविक्री ४,३३१.१ बिलियन येन (US$ ४१.८ बिलियन*) एवढी झाली होती. मित्सुबिशी इलेक्ट्रिक ही भारतातीलग्राहकांना अनेक अभिनव आणि उच्चदर्जाची उत्पादने देण्यात आघाडीची कंपनीबनली आहे. त्यांच्या उत्पादनांमध्ये आणिसेवांमध्ये एअर कंडिशनर्स, फॅक्टरीऑटोमेशन, आणि इंडस्ट्रियल सिस्टिम्स, फोटोवोल्टाइक  सोल्युशन्स, सेमीकंडक्टर्सआणि तत्सम यंत्रे, दळणवळण सामुग्री,आणि व्हिजुअल आणि इमेजिंग यांचासमावेश होतो. :http://in.mitsubishielectric.com/en/index.page.अधिक माहितीसाठी यासंकेतस्थळाला भेट द्या.  

Uncategorized

आमदार मुश्रीफ यांचे कागलसह चंदगडच्या खराब रस्त्यांप्रश्नी आंदोलन

November 27, 2018 0

मुंबई, :आमदार हसन मुश्रीफ यांनी कागल व चंदगड विधानसभा मतदारसंघातील खराब रस्त्यांच्या निषेधार्थ विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन केले. या दोन्ही मतदारसंघात विरोधी आमदार असल्यामुळेच सरकारने निधी देण्यात दुजाभाव केला आहे .त्यामुळेच रस्त्यांची दुर्दशा झाल्याचा आरोपही , […]

Uncategorized

सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये 14 ते 16 डिसेंबर दरम्यान मोफत कर्करोग निदान शिबीर

November 27, 2018 0

कोल्हापूर: सिध्दगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर तर्फे अहमदाबाद बेंगलोर हैदराबाद मुंबई पुणे येथील राष्ट्रीय स्तरावरील कॅन्सर तज्ञांच्या मार्फत दिनांक 14 ते 16 डिसेंबर दरम्यान मोफत कर्करोग निदान व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अशी […]

1 5 6 7 8 9 62
error: Content is protected !!