स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ मध्ये होणार दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स
स्टार प्रवाहने नेहमीच नवीन आणि अनुभवी कलाकारांना एकत्रव्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. अनेक सुपरहिट गाण्यांसाठीप्रसिद्ध असलेले दादूस, अर्थात संतोष चौधरी यांच्या धमाकेदारगाण्य़ाचा परफॉर्मन्स स्टार प्रवाहच्या ‘छोटी मालकीण’ या मालिकेतपहायला मिळणार आहे. आगरी कोळी हळदीच्या गाण्यासाठीलोकप्रिय असलेले लाडके दादूस या गाण्यानं धमाल उडवून देणारआहेत. ‘छोटी मालकीण’ या मालिकेतील रेवतीच्या आयुष्याला कलाटणीमिळण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. रेवतीचं लग्न होणारकी नाही, अशी वेळ आलेली असताना घरातला नोकर श्रीधर तिच्याशीलग्न करण्याची तयारी दर्शवतो. आपल्या छोट्या मालकीणीलाअडचणीतून बाहेर काढण्यासाठी, तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचातो निश्चय करतो. या लग्नादरम्यान मानपानावरून बराच गोंधळ उडतो, रुसवे-फुगवेही होतात. श्रीधर आणि रेवाच्या लग्नाच्या हळदीचा रंगचढणार आहे तो दादूसच्या दमदार परफॉर्मन्समुळे. दादूस त्यांच्यागाण्यानं हळदीचा कार्यक्रम कसा रंगवतात हे पहाणं उत्सुकतेचं ठरेल. श्रीधर आणि रेवाच्या हळदीत दादूसचा धमाकेदार परफॉर्मन्स दर्शकांनापाहता येईल गुरु. दि २९ आणि शुक्र. दि ३० मार्च रोजी रात्री ९ वाजताफक्त स्टार प्रवाहवर.