कोल्हापूर: अवघ्याअडीच वर्षांत 100 यशस्वी यकृत प्रत्यारोपणकेल्याच्या निमित्ताने सह्याद्रि हॉस्पिटल्स आणिडॉ.कोराणे यांचे सनराईज हॉस्पिटल कोल्हापूरयांच्या संयुक्त विद्यमाने पर्ल हॉटेल येथे मोफतयकृत तपासणी शिबिराचे आयोजनशुक्रवार,19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 तेदुपारी 4 दरम्यान करण्यात आले आहे. याशिबिराकरिता हेपॅटोबिलियरी व लिव्हरट्रान्सप्लांट सर्जन डॉ.बिपीन विभूते मोफतसल्ला व मार्गदर्शन करणार आहेत.तसेचरूग्णांना तपासणीवर विशेष सवलत देण्यातयेईल.हे शिबीर पर्ल हॉटेल,न्यू शाहूपुरी,कोल्हापूर येथेआयोजित करण्यात आले असून अधिकमाहिती व नोंदणीसाठी 7030522889 याक्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.यकृताचे आजार ही भारतात एक मोठीसमस्या आहे.बदलतीजीवनशैली,व्यसन,खाण्यापिण्याच्या चुकीच्यासवयी यामुळे ही समस्या अधिक वाढत चाललीआहे. लवकर निदान आणि योग्य वेळी उपचारकेल्यास अनेक जीव वाचू शकतात. निमशहरीआणि ग्रामीण भागातील रुग्णांना निदान वउपचार या सोयींचा फायदा व्हावा यादृष्टीनेसह्याद्रि हॉस्पिटल्स तर्फे प्रमुख जिल्ह्यांमध्येलिव्हर ओपीडी चे आयोजन केले जात आहे. कोल्हापूर मधील शिबिर याच उपक्रमाचा भागआहे.प्रसंगी सह्याद्रि हॉस्पिटल्सचे हेपॅटोबिलियरीव लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन डॉ.बिपीन विभूतेयांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले, सह्याद्रिहॉस्पिटलने नुकताच 100 यकृतप्रत्यापरोपणाचा महत्त्वाचा टप्पा पार केलाआहे. 100 वे यकृत प्रत्यारोपण हा महत्त्वाचाटप्पा पार करत असताना अनेकांना नवीनजीवन मिळाले याचा आम्हाला अत्यंत आनंदआहे. अद्ययावत सुविधा,समर्पित डॉक्टरांचीटीम आणि प्रशिक्षित कर्मचारी तसेच यकृतआजारांसाठी अखंड वैद्यकीय सेवा यामुळे हेयश शक्य झाले आहे. सर्वांपर्यंत या सुविधापोहोचाव्यात या आमच्या कटिबध्दतेअंतर्गतमहाराष्ट्रातील विविध भागात आम्ही मोफतयकृत तपासणी शिबिर आयोजित करतआहोत .कोल्हापूर बरोबरचऔरंगाबाद,सांगली,सोलापूर,सातारा येथे यकृततपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येतआहे.डॉ.विभूते पुढे म्हणाले की,सह्याद्रिचे लिव्हरक्लिनिक हे पश्चिम भारतातील अत्याधिकयशस्वी आणि झपाट्याने विकसित होतअसलेला लिव्हर ट्रान्सप्लांट प्रोग्राम ठरलाआहे. त्याबरोबरच महाराष्ट्रातील सर्वाधिककिडनी स्वादुपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियाकरणारे हे पहिलेच हॉस्पिटल आहे.भारतातीलसर्वांत किफायतशीर व विश्वासार्ह यकृतप्रत्यारोपण केंद्र म्हणून हे ओळखलेजाते.रूग्णांच्या सोयीकरिता यकृतप्रत्यारोपणासाठी सुलभ मासिक हप्त्यांचीसुविधा देखील येथे उपलब्ध करून देण्यातआली आहे.लिव्हर ट्रान्सप्लांट सेवा ही फक्त मोठ्याशहरामध्ये सीमित राहू नये व जास्तीत जास्तलोकांना याचा लाभ घेता यावा,या हेतूने सह्याद्रिहॉस्पिटल्स व अहमदनगर येथील डॉ.काळोखेयांचे गॅलेक्सी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानेलिव्हर ओपीडी सुरू आहे. सह्याद्रिहॉस्पिटल्सचे लिव्हर तज्ञ दर महिन्याच्यातिसऱ्या शुक्रवारी लिव्हर ओपीडीसाठीउपलब्ध असतात. 100 यशस्वी यकृत प्रत्यारोपणाचा महत्त्वाचाटप्पा पार करण्यामध्ये डॉ.बिपीनविभूते,डॉ.दिनेश झिरपे,डॉ.शैलेशसाबळे,डॉ.मनीष पाठक,डॉ.अभिजीतमाने,डॉ.संदिप कुलकर्णी आणि डॉ.अनिरूध्दभोसले अशा अनुभवी लिव्हर तज्ञांच्या टीमनेसहभाग घेतला होता.यकृत प्रत्यारोपण झालेले रुग्ण वैभव पंडितआणि संग्राम चव्हाण म्हणाले की यकृतप्रत्यारोपण झाल्यावर आम्ही पुन्हा अधिसारखेव वेदनावीरहीत आयुष्य जगत आहोत .अवयदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्याबाबतजागरूकता निर्माण करत आम्ही मिळालेलेनवजीवन सार्थक करण्याचा प्रयत्न करू .