Uncategorized

कोल्हापूरच्या दिग्दर्शकाची निर्मिती असलेला मराठी चित्रपट ‘सोचू तुम्हे

January 11, 2018 0

कोल्हापूर : कोल्हापूरला कलेचे वारसा आहेच पण चित्रपट निर्मितीची पायामुळ इथेच रोवली गेली. आज बॉलीवूड, टॉलीवूड, आले पण शंभर वर्षापूर्वी १९१७ साली बाबुराव पेंटर यांनी कोल्हापुरात चित्रपट निर्मिती सुरु केली. कोल्हापूरच्या मातीन अनेक दिग्गज कलाकार, […]

No Picture
Uncategorized

लोकनेते सदाशिवराव मंडलिक स्मृती पुरस्कार सोहळा रद्द

January 6, 2018 0

कोल्हापूर प्रतिनिधी :भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत त्यातून राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ९ व १० जानेवारीचा […]

Uncategorized

यकृत आणि त्या संबंधित आजारांच्याबाबत ज्युपिटर हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

January 6, 2018 0

कोल्हापूर : रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनियमित आणि आरोग्याला हानिकारक अशी झाली आहे. यामुळे अनेक जटील गुंतागुंतीच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. त्यापैकी एक असे यकृत आणि त्या संबंधातील आजाराविषयी फारशी माहिती नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. […]

Uncategorized

भीमा-कोरेगाव प्रकरणी महाराष्ट्र बंद मागे : प्रकाश आंबेडकर

January 3, 2018 0

भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला महाराष्ट्र बंद आज भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.बंद शांततेत पार पडल्याचे सांगत प्रकाश आंबेडकर पुढे […]

Uncategorized

पद्मावती फिल्मचे नाव पद्मावत होणार

January 3, 2018 0

मुंबई प्रतिनिधी : संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ चित्रपटाला अखेर प्रदर्शनासाठी मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय चित्रपट निरीक्षण मंडळाने काही बदल करण्याचे सुचवून संजय लीला भन्साळी यांना चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे.  चित्रपटाचे नाव […]

Uncategorized

उद्या बंद तात्पुरता मागे ; दंगलीमागे मोठे षड्यंत्र समाज बांधवानी शांतता राखावी : आमदार क्षीरसागर यांचे आवाहन

January 3, 2018 0

कोल्हापूर : भीमा कोरेगांव येथील घटनेचे समर्थन करू शकत नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील समस्त दलित संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला कोल्हापूर शहरातील समस्त व्यापारी वर्गाने प्रतिसाद दिला, पण काही समाजकंटकानी शहरामध्ये दहशत माजवत हजारो गाड्या फोडल्या, […]

Uncategorized

कोल्हापूर बंदला हिंसक वळण

January 3, 2018 0

कोल्हापूर : भीमा कोरेगाव घटनेच्या तीव्र निषेधार्थ काल आंबेडकर वादी संघटनांनी  महाराष्ट्र बंदची हाक दिली. त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर मध्ये  बंदला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.पण बंदला हिंसक वळण लागले.  संभाजी नगर चौक,शिवाजी पूल येथे रास्ता रोको […]

Uncategorized

उद्या कोल्हापूर बंद; भीमा कोरेगावचे घटनेचे पडसाद

January 2, 2018 0

कोल्हापूर  : भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचा पडसाद म्हणून मंगळवारी दुपारी शहरात विविध ठिकाणी आंदोलने, करण्यात आले. यामध्ये आंदोलकांनी बिंदू चौक, दसरा चौक, कावळा नाका आदी ठिकाणी निदर्शने, रास्ता रोको केले. त्यानंतर सायंकाळी टाऊन हॉल येथे […]

Uncategorized

शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम लागणार मार्गी

January 2, 2018 0

अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर कोल्हापुरातील शिवाजी पुलाला पर्यायी पुलाचे काम, आता मार्गी लागणार आहे. पुरातत्व खात्याच्या आक्षेपामुळे, नव्या पुलाचे काम ३ वर्ष रखडले आहे. मात्र पुरातत्व कायद्यामध्ये सुधारणा करण्याचे विधेयक आज लोकसभेत मंजूर झाल्याने, पूल बांधकामातील […]

Uncategorized

‘ये रे ये रे पैसा’झी स्टुडिओजची रसिक प्रेक्षकांना नववर्ष भेट

December 30, 2017 0

कोल्हापूर:दुनियादारीच्या अभूतपूर्व यशानंतर झी स्टुडिओज आणि संजय जाधव ही द्वयी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याकरिता पुन्हा एकदा एकत्र आली आहे. संजय जाधव दिग्दर्शित, झी स्टुडिओजचा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्याचे नाव आहे, ये रे ये रे पैसा. नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपल्या प्रेक्षकांना एक खास भेट देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून झी स्टुडिओजने पाडला आहे. नटरंग, टाईमपास, लोकमान्य, नटसम्राट, ती सध्या काय करते अशा दर्जेदार कलाकृती देणाऱ्या झी स्टुडिओज् प्रस्तुत ये रे ये रे पैसा हा चित्रपट येत्या नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे ५ जानेवारी २०१८ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते संजय नार्वेकर आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच अवघ्या महाराष्ट्राचे लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार सिद्धार्थ जाधव, उमेश कामत आणि तेजस्विनी पंडित हे प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत.आज चित्रपटाची संपूर्ण टीम कोल्हापूरमध्ये प्रमोशन करिता आली असता सर्व कलाकार आणि चित्रपटाचे दिग्दर्शक व लेखक संजय जाधव यांनी पत्रकारांशी मुक्त संवाद साधला. ते म्हणाले चित्रपटाची   कथा  आहे  पाच माणसांची आणि त्यांच्या सोबत घडणाऱ्या गमतीदार गैरसमजाची. उमेश, तेजस्विनी, सिद्धार्थ, संजय नार्वेकर आणि मृणाल कुलकर्णी म्हणजेच आदित्य, बबली, सनी, अण्णा आणि जान्हवी या पाच जणांच्या आयुष्यात घडणारी एक घटना त्यांना विचित्रप्रकारे एकमेकांसमोर आणते. आपापल्या आयुष्यात या ना त्या कारणाने पैशाच्या आणि प्रसिद्धीच्या मागे पळत असताना होणाऱ्या भन्नाट गैरसमजांची आणि बनवाबनवीची रुपेरी पडद्यावर घडणारी मनोरंजनात्मक कॉमेडी म्हणजे ये रे ये रे पैसा. अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट, ट्रान्स एफएक्स स्टुडिओ प्रायवेट लिमिटेड आणि पर्पल बुल एंटरटेनमेंट यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून झी स्टुडिओज् ची प्रस्तुती आहे. संवाद आणि पटकथा अरविंद जगताप यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय अपूर्वा मोतीवाले आणि आशिष म्हात्रे यांनी तसेच छायाआरेखन आहे पुष्पांक गावडे यांचं. महेश साळगावकर यांचे कला दिग्दर्शन असून पंकज पडघन यांचे पार्श्वसंगीत आहे. या चित्रपटात एकूण तीन गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत अमितराज आणि पंकज पडघन यांनी. ये रे ये रे पैसा हे गाणं लिहिलंय सचिन पाठक यांनी तर स्वरबद्ध केलंय प्रवीण कुवर आणि जान्हवी प्रभूअरोरा यांनी. तर खंडाळ्याचा घाट हे गाणं अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि वैशाली सामंत ह्या त्रिकुटाने चित्रीकरणाच्या वेळी लाईव्ह गायले असून क्षितिज पटवर्धन यांनी लिहिले आहे. साऱ्या जगाची मी ड्रीमगर्ल हे गाणे सचिन पाठक यांनी लिहिले असून ते वैशाली सामंत यांनी गायले आहे. हा सिनेमा नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी २०१८ ला प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाला असून तो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही.

1 280 281 282 283 284 417
error: Content is protected !!