मे महिना संपत आला की सगळ्यांनाच वाईट वाटतं. सुट्टीसंपणार हे कारण असतंच, पण परमप्रिय आंबा थेट पुढच्यावर्षी मिळणार याची खंतही असते. आंब्याचा सीझन संपतासंपता त्याचा मनमुराद आनंद घेतला गेला तो स्टारप्रवाहच्या गोठ या मालिकेच्या सेटवर… गोठच्याकलाकारांनी एकत्र येत नुकतीच आंबा पार्टी केली. गोठच्या सेटवर नेहमीच काही ना काही गमतीजमती सुरूअसतात. आंबा पार्टी हा त्याचाच एक भाग होता. सुशीलइनामदार, रुपल नंद, सुरभी भावे, शलाका पवार, समीरपरांजपे या कलाकारांनी एकत्र येऊन आंब्यांवर मनसोक्तताव मारला. दुपारच्या जेवणात कोकणातून आणलेलेआंबे सगळ्यांनी भरपेट खाल्ले. सगळ्यांनी मिळून केलेली ही आंबा पार्टी फारच धमालहोती. आंब्याला नाही म्हणणं काही शक्य नसतं. त्यामुळेसगळेजण त्यात सामील झाले आणि भरपूर आंबे खाल्ले.आता अशा पार्टीसाठी पुढच्या वर्षीपर्यंत वाट पहावीलागेल,’ अशी भावना सर्वच कलाकारांनी व्यक्त केली.