Uncategorized

सर्व लाईन व्यस्त आहेत’च्या संगीत प्रकाशन सोहळा

November 27, 2018 0

तगडी स्टारकास्ट, धम्माल विनोदी आणि भन्नाट मनोरंजनकरणाया ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ या आगामी मराठीचित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मुंबई येथील फोरसिझन हॉटेलमध्ये थाटामाटात पार पडला. या दिमाखदारसोहळ्यात सिध्दार्थ जाधव, सौरभ गोखले, संस्कृती बालगुडे,स्मिता शेवाळे, नीथा शेट्टी, राणी अग्रवाल संगीतकार पंकजपडघन,.कोरिओग्राफर उमेश जाधव, दिलीप मेस्त्री, एडिटरआशिष म्हात्रे, डिओपी समीर आठल्ये  आदी मान्यवर उपस्थितहोते. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मिडीयांनी याचित्रपटातील संगीताला, गाण्यांना उत्तम प्रतिसाद दिला. सहसा कोणत्याही प्रकाशन सोहळ्यात एखाद्या कलाकाराच्याहस्ते प्रकाशन केले जाते पण ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’च्यासंगीत प्रकाशन सोहळ्यात अनेकांना एक खास सरप्राईजमिळालं आणि ते सरप्राईज म्हणजे या चित्रपटाच्या संगीताचेप्रकाशन मराठीतील वरिष्ठ पत्रकार दिलीप ठाकूर यांच्या हस्तेकरण्यात आले. आणि हा क्षण ठरला ‘सर्व लाईन व्यस्तआहेत’सोहळ्याचं वैशिष्ट्य. प्रदिप रघुनाथ मेस्त्री दिग्दर्शित ‘सर्व लाईन व्यस्त आहेत ‘ याचित्रपटाची निर्मिती स्टेलारीया स्टुडीयोची असून अमोल उतेकरयांनी प्रस्तुत केला  आहे. नेहमीच वेगळी भूमिका साकारणारेमहेश मांजरेकर यांनी या चित्रपटात देखील एक वेगळी भूमिकासाकारली आहे. या सोहळ्याला मिडीयाने जो भरभरुन प्रतिसाद दिलात्याविषयी व्यक्त होताना या चित्रपटाचे निर्माते अमोल उतेकरयांनी म्हटले की, “चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत मला या चित्रपटाविषयी जे अपेक्षित होतं त्यापेक्षा जास्तचांगला प्रतिसाद मला मिळाला आहे. मी नेहमीच पॉझिटिव्हहोतो की मिडीया  गाण्यांना चांगला प्रतिसाद देणार पणकालच्या सोहळ्यानंतर खरंच असं वाटतंय की मला जेअपेक्षित होत त्याहून जास्त चांगलं मला मिळालंय. आणियाचा मला आणि कलाकारांनाही फार आनंद झालाय.” ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ मध्ये ‘दिलाची तार’, गडबडे बाबा,  ‘येक नंबर’, ‘तू मोरपंखी’ आणि ‘या रे या रे नाचू सारे’ अशीएकूण पाच गाणी आहेत.  पंकज पडघन, उद्भव ओझा यांनी यागाण्यांना संगीत दिले आहे तर गायक आदर्श शिंदे, सौरभसाळुंखे, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, मधुरा पाटकर, उद्भवओझा, सागर फडके, अंकिता ब्रम्हे आणि रागिणी कवठेकरयांनी ही  गाणी गायली आहेत तसेच गीतकार श्रीकांत बोजेवार,वलय यांनी लिहिली आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवादगणेश पंडीत आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली आहेत. स्टेलारीया स्टुडियोज प्रस्तुत ‘सर्व लाईन व्यस्त आहेत’ याचित्रपटाची कथा दिग्दर्शक प्रदिप मेस्त्री यांनी लिहिली असूनखुमासदार विनोदामुळे प्रेक्षकांचे पूरेपूरे मनोरंजन करणारा हाचित्रपट नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारीलाप्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

Uncategorized

११ वर्षीय श्रेया देशपांडे हिचे टेनिस स्पर्धेमध्ये घवघवीत यश

November 23, 2018 0

कोल्हापूर : ऑल इंडिया रांकिंग टेनिस टूर्नामेंट मॅचेसच्या माध्यमातून ११ वर्षीय श्रेया देशपांडे हिने औरंगाबाद ,नागपूर, रायपूर( छत्तीसगड) आणि पाचगणी याठिकाणी झालेल्या टेनिस स्पर्धेमध्ये यश संपादन केले आहे. श्रेया देशपांडे हिने वयाच्या अवघ्या ५ वर्षी […]

Uncategorized

वर्षीय केदार साळुंखे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना देणार स्केटिंगद्वारे मानवंदना

November 23, 2018 0

कोल्हापूर : २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईतील हॉटेल ताज वर दहशतवादी हल्ला झाला होता या घटनेला दहा वर्ष झाली आहेत या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी ,अन्य पोलिस व नागरिक यांना मानवंदना देण्यासाठी व श्रद्धांजली […]

Uncategorized

सर्वसामान्यांच्या जोरावर विजयाची ‘हॅट्रिक’ : आ. राजेश क्षीरसागर यांना विश्वास

November 23, 2018 0

कोल्हापूर: गेल्या नऊ वर्षात शहराचा आमदार म्हणून व त्यापूर्वी पक्ष संघटनेत विविध पदावर काम करीत असताना सर्वसामान्य जनतेशी जुळलेली ‘नाळ’ आजही घट्ट आहे. याचा मनस्वी आनंद आहे. आंदोलन व विकासकामांच्या माध्यमातून जनतेने माझ्यावर टाकलेला विश्वास […]

Uncategorized

आयसीआयसीआय बँकने ‘ईझी पे’ वर नोंदवले 1.93 लाखाहून अधिक मर्चंट

November 22, 2018 0

पूर्णतः नव्या अॅपमध्ये या श्रेणीतील पहिल्या सेवा समाविष्ट; मर्चंट्स / रिटेलर्स यांना इन्व्हॉइस तयार करण्यासाठी बारकोड स्कॅन करता येतील, इन-बिल्ट डॅशबोर्डद्वारे इन्व्हेंट्रीचा व क्रेडिटवर विक्री केल्याचा मागोवा घेता येईल. त्यांना पूर्णतः डिजिटल व पेपरलेस पद्धतीने तातडीने कार्ड-स्वाइप मशीन मागवता येऊ […]

Uncategorized

हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना आमदारांची निदर्शने

November 19, 2018 0

मुंबई  : मराठा समाजाला आरक्षण यासह विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यभरात मराठा क्रांती मूक मोर्चा लाखोंच्या संखेने पार पडले आहेत. या मोर्चाना सुमारे दोन वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही मराठा समाजाला आजतागायत आरक्षण मिळालेले नाही. मराठा […]

Uncategorized

५०% टक्के स्त्री पुजारी नेमा या कायद्यामुळेच चालढकल -डॉ. सुभाष देसाईंचा आरोप

November 19, 2018 0

कोल्हापूर: श्री अंबाबाई पुजारी हटाव कायद्याची अमलबजावणी का होत नाही?अशी लाखो स्त्री-पुरुष भक्तांची विचारणा झाली तरी हे सरकार त्याची दखल घ्यायला तयार नाही.शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकरण्या मागे मनुवादी वृत्ती आहे.स्त्रियांना शूद्राती शुद्र समजण्याची बुरसटलेली […]

Uncategorized

शिवाजी विद्यापीठाचा ५६ वा वर्धापनदिन उत्साहात

November 19, 2018 0

कोल्हापूर:उच्चशिक्षणाच्या क्षेत्रात अनेक बदल गतीने होत आहेत. या नव्या बदलांना सामोरे जाण्यास विद्यापीठांनी सज्ज व्हावे, असे प्रतिपादन जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या ५६व्या […]

Uncategorized

महिंद्राने एचसीव्ही ट्रक्स रेंजमध्ये दाखल केला ब्लेझो एक्स

November 19, 2018 0

मुंबई : महिंद्रा ट्रक अँड बस (एमटीबी) या 20.7 अब्ज डॉलर उलाढालीच्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने लोकप्रिय ब्लेझो ट्रक अपग्रेड करून, एचसीव्ही ट्रक रेंजमध्ये ब्लेझो एक्स दाखल केल्याची घोषणा केली. ब्लेझो एक्स हा ब्लेझोपेक्षा […]

Uncategorized

गडहिंग्लज तालुक्यातील विकास कामांचा खा.धनंजय महाडिक यांच्या हस्ते शुभारंभ

November 19, 2018 0

गडहिंग्लज: ग्रामीण भागातील रस्ते आणि विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात खासदार फंडातून निधी उपलब्ध केला आहे. ग्रामीण भागाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. गडहिंग्लज तालुक्यातील विविध गावांत खासदार स्थानिक […]

1 6 7 8 9 10 62
error: Content is protected !!